गडावर दुर्गाष्टमीला भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:10 IST2017-09-28T23:30:33+5:302017-09-29T00:10:27+5:30
सप्तशृंगगडावर आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगीदेवीच्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवातील दुर्गाष्टमीनिमित्त पालखी मिरवणूक गड परिसरात काढण्यात आली. देवीभक्तांनी मनोभावे दर्शन घेऊन पालखी मिरवणुकीत सहभागी झाले. दुर्गाष्टमीला ५० हजार देवीभक्त देवीचरणी नतमस्तक झाले.

गडावर दुर्गाष्टमीला भाविकांची मांदियाळी
कळवण : सप्तशृंगगडावर आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगीदेवीच्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवातील दुर्गाष्टमीनिमित्त पालखी मिरवणूक गड परिसरात काढण्यात आली. देवीभक्तांनी मनोभावे दर्शन घेऊन पालखी मिरवणुकीत सहभागी झाले. दुर्गाष्टमीला ५० हजार देवीभक्त देवीचरणी नतमस्तक झाले.
भगवतीची पंचामृत महापूजा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे व कळवण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उषा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदी उपस्थित होते. आज सकाळी ७.३० वाजता श्री सप्तशृंगीदेवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ८ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. गुरुवारी दुपारी १२ वाजता देवीची पंचामृत महापूजा करण्यात येऊन हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील विविध भागातील बहुसंख्य भाविक महाआरतीला मंदिर परिसरात उपस्थित होते. देवीभक्तांमधील उत्साहामुळे गडावर चैतन्याचे वातावरण पसरले आहे. दैनंदिन अलंकार पूजा, मिरवणूक व पूजन आदी विधीदेखील चैतन्यपूर्ण वातावरणात व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडत आहे. राज्यभरातून विविध भागातून भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.