शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

‘न्यू एज्युकेशन’चा माजी विद्यार्थी मेळावा

By admin | Published: December 22, 2015 10:22 PM

वर्ग भरला : माजी शिक्षक-विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा

नाशिक : दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अमृतपूर्ती महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांचा मेळावा डी. डी. बिटको बॉइज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडांगणावर उत्साहात झाला. वय वर्षे २० ते ८२ व्या वर्षापर्यंतचे माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वैशंपायन यांच्या हस्ते माजी शिक्षक आबा गाडगे, मंगला कविश्वर, वसुधा कडेपूरकर, कमलाकर यार्दी, रामदास महाले, भास्कर तानपाठक, सुरेश पिंगळे, भि. रा. सावंत, कृष्णाजी देवते, दत्तात्रय भटमुळे, जयकृष्ण शर्मा यांचा, तर माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ क्रीडा समीक्षक वि. वि. करमरकर, लक्ष्मण सावजी, विनायक पांडे, संजय चव्हाण, सचिन जोशी, शोभा छाजेड, उत्तरा करंदीकर, सुजाता डेरे, अजित चव्हाण, नरेंद्र छाजेड, लक्ष्मण मंडले, जयराम पुरी यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी भारती आव्हाड यांनी गणेशवंदना सादर केली. अमृतपूर्ती समितीचे प्रमुख प्रा. रवींद्र कदम यांनी प्रास्ताविक केले. भास्कर कविश्वर, वाय. डी. बिटको गर्ल्सच्या मुख्याध्यापक रेखा काळे यांनी परिचय करून दिला. सुरेखा कमोद यांनी अध्यक्षांच्या संदेशाचे वाचन केले. स्नेहल सारंग यांनी सूत्रसंचालन केले. सचिव हेमंत बरकले यांनी आभार मानले. ऋतुजा नाशिककर यांनी पसायदान सादर केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)