शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विवाहिता प्राध्यापकाला कुंकू लावून माजी विद्यार्थ्याने केला विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 18:45 IST

पिडित विवाहिता प्राध्यापक नेहमीप्रमाणे गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात नोकरीसाठी हजर झाल्या होत्या.

ठळक मुद्दे प्राध्यापकाच्या कपाळावर बळजबरीने कुंकू लावत‘तु माझ्यासोबत लग्न कर’ पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केली.

नाशिक : शहरातील एका महाविद्यालयातील प्रयोगशाळेत धक्कादायक असा प्रकार घडला. या महाविद्यालयातून एम.एस्स.सी ची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याने चक्क विवाहिता प्राध्यापकाच्या कपाळावर बळजबरीने कुंकू लावत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिडित विवाहिता प्राध्यापक नेहमीप्रमाणे गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात नोकरीसाठी हजर झाल्या होत्या. ते नियमितपणे प्रयोगशाळेत कर्तव्य बजावत असताना सोमवारी (दि.२१) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास संशयित योगेश रमेश जावळे (२९, रा.चव्हाणके टॉवर मखमलाबादनाका) याने पिडित विवाहितेसोबत फोनवर संपर्क साधत व प्रत्यक्ष भेटून लग्नाची मागणी घातली. विवाहितेने नकार दिल्याचा राग येऊन जावळे याने थेट प्रयोगाशाळेत विवाहितेचा हात धरला ‘तु माझ्यासोबत लग्न कर’ असे सांगून खिशातून कुंकुवाची पुड काढत कपाळावर कुंकू भरण्याचा प्रयत्न केला; मात्र विवाहितेने त्याचा हाताला जोरदार हिसका दिल्याने कुंकुवाची पूड जमिनीवर पसरली. यावेळी झालेल्या आरडाओरडचा व साहित्य पडण्याचा आवाज ऐकूण फिर्यादी पिडितेला सोडविण्यासाठी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. दरम्यान, संशयित जावळे याने कर्मचा-यांना धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केल्याचे पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलिसांनी संशयित जावळेविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी (दि.२२) संध्याकाळी त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.दरम्यान, या घटनेनंतर महाविद्यालयाच्या परिसरात एकच चर्चा सुरू झाली होती. घडलेला प्रकार अत्यंत निंदणीय असा असून संतप्त भावना शिक्षकवर्गातून उमटल्या. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केली. याप्रकरणी अधिक तपास योगिता नारखेडे करीत आहेत. 

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय