महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 09:10 IST2021-07-04T09:09:47+5:302021-07-04T09:10:05+5:30

नाशिकच नव्हे तर राज्यातील व्यापारी वर्गाचे त्यांनी नेतृत्व केले. जेसीज सारख्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यही केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई तसेच बंधू कापड व्यापारी सुरेश कापडिया असा परिवार आहे.

Former President of Maharashtra Chamber of Commerce Digvijay Kapadia passes away | महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचे निधन

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचे निधन

नाशिक-  येथील प्रख्यात कापड व्यापारी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कपाडिया यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते.

नाशिकच नव्हे तर राज्यातील व्यापारी वर्गाचे त्यांनी नेतृत्व केले. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्षपद तसेच नाशिक रिटेल क्लॉथ मर्चंट असोसिएशन तसेच ऑल इंडिया रिटेल क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले राज्यातील महापालिकांमधील जकात हटविण्यासाठी त्यांनी लढा दिला तसेच नाशिकच्या गुजराती समाजाच्या पंचवटी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. जेसीज सारख्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यही केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई तसेच बंधू कापड व्यापारी सुरेश कापडिया असा परिवार आहे.

Web Title: Former President of Maharashtra Chamber of Commerce Digvijay Kapadia passes away