माजी मंत्री विजयकुमार गावित रुग्णालयात मेंदूत रक्ताची गाठ

By Admin | Updated: June 24, 2015 01:33 IST2015-06-24T01:32:35+5:302015-06-24T01:33:10+5:30

माजी मंत्री विजयकुमार गावित रुग्णालयात मेंदूत रक्ताची गाठ

Former minister Vijaykumar Gavit hospital receives blood pressure | माजी मंत्री विजयकुमार गावित रुग्णालयात मेंदूत रक्ताची गाठ

माजी मंत्री विजयकुमार गावित रुग्णालयात मेंदूत रक्ताची गाठ

  नाशिक : माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अचानक झटका येऊन त्यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी सोमवारी (दि.२२) रात्री दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असून मेंदूच्या एमआरआय चाचणीत त्यांच्या मेंदूत रक्ताची एक छोटी गाठ असल्याचे आढळून आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोमवारी दिवसभर नाशिकला उपस्थित राहून रात्री मुंबईकडे डॉ.विजयकुमार गावित इको स्पोर्ट (एमएच १५-३१६१) वाहनाने मुंबईकडे जात असताना घोटी टोल नाक्यानजीक अचानक डॉ.गावित यांना झटका आला. त्यात ते बेशुध्द पडल्याचे वाहन चालविणारे त्यांचे समर्थक एन.डी.गावित यांच्या लक्षात येताच विलंब न करताच वाहन नाशिकला आणून डॉ.विजयकुमार गावित यांना सुयश रुग्णालयात दाखल केले. डॉ.गावित यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही कन्या खासदार हिना गावित व पीयूष गावित होत्या. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईच्या नायर रुग्णालयाचे डॉ. चौरेसिया यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सुयश रुग्णालयाचे डॉ. शिंदे यांच्याशी डॉ.चौरेसिया यांनी चर्चा केली. पहाटे साडेचारच्या सुमारास डॉ. विजयकुमार गावित शुध्दीवर आले. पहाटेच त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कुमोदिनी गावित, बंधू शरद गावित, राजेंद्र गावित, संजय गावित तातडीने नाशिकला दाखल झाले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Former minister Vijaykumar Gavit hospital receives blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.