शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 07:12 IST

Tukaram Sakharam Dighole Death: सिन्नर तालुक्यातील जायगावचे भूमिपुत्र असलेल्या दिघोळे यांनी 1985 ते 1999 या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत सिन्नर विधानसभा निवडणुकीत  विजय मिळविला होता.

सिन्नर (नाशिक) : सलग तीन वेळा आमदार झालेले व माजी राज्यमंत्री, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  तुकाराम सखाराम दिघोळे(77) यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. नाशिक येथील खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

सुमारे तीन महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी अशालता, मुलगा अभिजित, मुलगी अंजली राठोड असा परिवार आहे.

सिन्नर तालुक्यातील जायगावचे भूमिपुत्र असलेल्या दिघोळे यांनी 1985 ते 1999 या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत सिन्नर विधानसभा निवडणुकीत  विजय मिळविला होता. युती शासनाच्या काळात त्यांनी साडेतीन वर्षे ऊर्जा आणि ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. नाशिक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, शिखर बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या दिघोळे यांचे सिन्नरच्या विकासात मोठे योगदान आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून हजारो युवकांना रोजगार मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. दारणा नदीपात्रातून सिन्नर शहरासाठी पाणीयोजना राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा उचलला. कडवा धरणाचे पाणी पूर्व भागात आणण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

टॅग्स :ministerमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेस