शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या नाशिक शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अनिल मटाले यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 14:55 IST

फेरबदल : प्रदेश सरचिटणीसपदी माजी महापौर अशोक मुर्तडक

ठळक मुद्देमनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिलेमावळते शहराध्यक्ष राहुल ढिकले यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती कायम

नाशिक : महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अनिल मटाले तर प्रदेश सरचिटणीसपदी माजी महापौर अशोक मुर्तडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. मावळते शहराध्यक्ष राहुल ढिकले यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती कायम ठेवली आहे.दोन महिन्यांपूर्वी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शहरात घेतलेल्या पदाधिका-यांच्या मेळाव्यात संघटनात्मक बदलाची घोषणा केली होती. तेव्हापासून कार्यकर्त्यांनाही फेरबदलाचे वेध लागले होते. अखेर, माजी नगरसेवक अनिल मटाले यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून मावळते शहराध्यक्ष राहुल ढिकले यांचेकडे प्रदेश उपाध्यक्षपद कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय, माजी महापौर अशोक मुर्तडक यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल मटाले यांनी महापालिकेत मनसेच्या सत्ताकाळात नगरसेवकपदाबरोबरच गटनेतापद भूषविले होते. एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. राहुल ढिकले यांच्याकडील शहराध्यक्षपदाचा भार काढून घेण्यात आला आहे . राहुल ढिकले हे नाशिक पूर्व विभागातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांच्या भेटीगाठीही सुरू केल्या आहेत. माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडे सध्या कोणतेच पद नव्हते. त्यांना आता प्रदेशवर स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, संघटनेची बांधणी करण्यावर आपला भर राहणार असून कार्यकारिणीत नव्या-जुन्यांचा मिलाफ साधत क्रियाशिल कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचे नवनियुक्त अनिल मटाले यांनी सांगितले.भोसलेंचे पुनर्वसन नाहीमागील विधानसभा निवडणूक पराभव पाहावा लागलेल्या माजी आमदार नितीन भोसले यांना पुन्हा शहराध्यक्षपदाची सूत्रे दिली जातील, असा कयास व्यक्त केला जात होता. मध्यंतरी नितीन भोसले हे राज ठाकरे यांच्या दौ-यात दिसलेही होते. परंतु, भोसले यांना पुन्हा संधी देण्याऐवजी राज यांनी अनिल मटाले या तरुण कार्यकर्त्याच्या हाती शहराच्या नेतृत्वाची धुरा सोपविली आहे. त्यामुळे भोसले यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. भोसले आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक अथवा पश्चिम मतदारासंघातून उमेदवारी करण्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :NashikनाशिकMNSमनसे