माजी नगराध्यक्ष शरदराव महाजन यांचे निधन
By Admin | Updated: March 24, 2016 23:39 IST2016-03-24T23:39:02+5:302016-03-24T23:39:02+5:30
माजी नगराध्यक्ष शरदराव महाजन यांचे निधन

माजी नगराध्यक्ष शरदराव महाजन यांचे निधन
त्र्यंबकेश्वर : येथील जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे, दोनदा नगराध्यक्षपदाचा मान मिळालेले ज्येष्ठ नेते शरदराव गंगाधर महाजन (८५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
महाजन हे त्र्यंबक नगरपालिकेच्या सक्रिय राजकारणात सहभागी होते. त्यांचे सहकारी यादवराव तुंगार, बाबूराव थेटे, स्व. रमेशचंद्र थेटे, स्व. दामूअण्णा अडसरे, दत्तोपंत नाईकधुडी आदि होते. ते सन १९६८ व १९७१-७२ मध्ये पालिकेत दोन वेळा नगराध्यक्ष होते.
भाजपाचे ते अनेक वर्षे शहराध्यक्ष होते. त्यांना सन २००५ मध्ये लोकसभेचे माजी सभापती मनोहरपंत जोशी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव केला होता. ते नि:स्पृह व सच्चे कार्यकर्ते होते. त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविले होते. बरेच वर्ष ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेचे, श्रीराम मंदिराचे अध्यक्ष होते. (वार्ताहर)