शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगराध्यक्षांमध्ये लढत

By admin | Updated: November 15, 2016 01:02 IST

माजी नगराध्यक्षांमध्ये लढत

विलास भालेराव  भगूरयेथील प्रभाग २ ब हा जनरल असून, येथे दोन प्रबळ माझी नगराध्यक्ष आणि समजाचे नेते असल्याने तिरंगी जरी असली, तरी खरी लढत दोन माजी नगराध्यक्षांमध्ये होण्याची शक्यता असून, तिसरा कोणाची मते खाणार यावर दोघांचे भवितव्य अवलंबून आहे.प्रभाग २ ब मध्ये जलशुद्धीकरण केंद्र, सुकापूरपेठ व श्रीकृष्णवाडा परिसर येतो. मतदार संख्या १४८१ असून, येथे मराठा, दलित मतदार जास्त आहेत. येथून शिवसेनेतर्फे विजय करंजकर, आघाडीकडून भारती साळवे व भाजपाचे प्रसाद आडके नशीब आजमावत आहेत. यातील विजय करंजकर हे विद्यमान नगरसेवक असून, दोन वेळेस भगूरचे नगराध्यक्ष होऊन गेले आहेत. शिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असल्याने मराठा मतदारांवर त्यांची चांगली पकड आहे. त्यांनी गावची विकासकामे केली असून, ते प्रबोधन मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राजकीय नियोजन आणि उत्कृष्ट वक्तृत्व असल्याने त्यांना मानणारा मतदार असून, त्यांच्या पत्नी विद्यमान नगराध्यक्ष होत्या. भारती साळवे या विद्यमान नगरसेवक असून, त्यांनी दोन वेळेस नगराध्यक्षपद भूषविले आहे. शिवाय रिपब्लिकन पक्ष आणि दलित समाजाच्या प्रमुख नेत्या असल्याने दलित बहुजन मतदारांवर त्यांची चांगलीच पकड आहे. त्यांनीही गावची विकासकामे केली असून, त्या माता रमाई आंबेडकर महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. राजकीय नियोजन आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणाऱ्या भारती साळवे या प्रभागातील रहिवासी असून, त्या प्रभाग ८ मध्ये राहतात. तरीही मागील निवडणुकीत प्रभाग १ मधून निवडून आल्या होत्या. आताही त्या प्रभाग-२ मधून लढत आहेत. दलित मतदारांवर त्यांची विशेष मदार आहे. आघाडीकडून त्या पंजा चिन्हावर लढत आहेत. प्रसाद आडके हा मराठा समाजाचा नवयुवक आहे. माजी नगरसेवक मीना आडके या त्यांच्या आई. वडील अंबादास आडके सहकारी संस्थांचे हुशार व्यक्तिमत्त्व आणि ३० वर्षांपासून संचालक पदाधिकारी असा राजकीय वारसा प्रसाद आडकेला असून, हा समाजसेवक उच्चशिक्षित आहे.