माजी सनदी अधिकारी निवडणूक रिंगणात

By Admin | Updated: January 21, 2017 22:49 IST2017-01-21T22:48:55+5:302017-01-21T22:49:15+5:30

माजी सनदी अधिकारी निवडणूक रिंगणात

Former Chancellor Officer in the election | माजी सनदी अधिकारी निवडणूक रिंगणात

माजी सनदी अधिकारी निवडणूक रिंगणात

नाशिक : रायगड विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीकडून गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करून अपयश पदरात पाडून घेतलेले पोलीस सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी संजय अपरांती यांनी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सतरा पक्ष, संघटनांची मोट बांधून पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केली असली तरी, यापूर्वीही नाशिक शहरात अशाप्रकारे निवडणुकीच्या तोंडावर अनेक आघाड्या करण्यात आल्या, परंतु निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर या आघाड्यांनी गाशा गुंडाळल्याचा इतिहास आहे.  वाहतुकीचा उडालेला बोजवारा, वाढलेली गुन्हेगारी, वाढलेले अपघात, ढिसाळ प्रशासनाचे दुर्लक्ष व आरोग्य आणि शैक्षणिक संस्थांची दुरवस्थेतून नाशिककरांची सुटका करण्यासाठी ही आघाडी काम करेल, असे जाहीर करण्यात आलेले आहे. संजय अपरांती यांनी सहायक पोलीस आयुक्त, ग्रामीण भागात उप अधीक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे नाशिककरांशी त्यांचे नाते जुनेच असल्याने त्यातून सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात असून, समाजकारण करताना त्याला राजकारणाची जोड मिळावी म्हणून अपरांती यांनी यापूर्वीच आपली राजकीय ताकद अजमावून पाहण्याचा प्रयत्न केला होता व त्यासाठी त्यांनी रायगड विधानसभा मतदारसंघाची निवड केली होती. त्यांची ही भूमिका मात्र राजकारणाच्या पडद्यावर मतदारांना भावली नाही, परिणामी पराभवाची धूळ चाखत अपरांती यांना नाशकात दाखल व्हावे लागले होते.

Web Title: Former Chancellor Officer in the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.