भाजपाच्या माजी नगरसेवकावर हल्ला

By Admin | Updated: January 15, 2015 23:59 IST2015-01-15T23:59:36+5:302015-01-15T23:59:52+5:30

भाजपाच्या माजी नगरसेवकावर हल्ला

Former BJP corporator attacked | भाजपाच्या माजी नगरसेवकावर हल्ला

भाजपाच्या माजी नगरसेवकावर हल्ला

नाशिक : भाजपाचे माजी नगरसेवक शरद सानप यांच्यावर हल्ला झाल्याची घटना आज दुपारी दिंडोरीरोडवरील बाजार समितीच्या आवारात घडली़
दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सानप हे बाजार समितीच्या आवारात एका व्यापाऱ्याशी चर्चा करत होते़ यावेळी त्यांच्या बाजूलाच काही युवकांचा गोंधळ सुरू होता़ यावेळी सानप यांनी त्यांना गोंधळ न घालण्याबाबत सांगितले असता सदर युवक व सानप यांच्यात शाब्दिक चकमक झाली़ याचे पर्यावसन हाणामारीत झाले़ सुमारे चार ते पाच युवकांनी सानप यांच्यावर हल्ला केला़ यामध्ये सानप यांच्या डोक्यास तसेच पाठीस दुखापत झाली. या घटनेस भाजपाचे पदाधिकारी विजय सानप यांनी दुजोरा दिला आहे़, तर हल्लेखोरांपैकी एक युवकही जखमी झाला असल्याचे समजते़ (प्रतिनिधी)

Web Title: Former BJP corporator attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.