नियमानुसारच प्रारूप प्रभाग रचना

By Admin | Updated: September 18, 2016 00:33 IST2016-09-18T00:26:47+5:302016-09-18T00:33:30+5:30

आयुक्त : हस्तक्षेप झाला नसल्याचे स्पष्टीकरण

Format ward composition as per rules | नियमानुसारच प्रारूप प्रभाग रचना

नियमानुसारच प्रारूप प्रभाग रचना

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या नियम व निर्देशानुसारच झाली असून, त्यात कोणाचाही हस्तक्षेप झाला नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
शिवसेनेचे माजी नगरसेवक भगवान भोगे यांनी प्रारूप प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला आहे. भोगे यांनी त्यात भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्यावरच निशाणा साधला होता. त्यातच शहरात प्रारूप प्रभाग रचनेची गोपनीय माहिती फुटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सदर आरोप आणि चर्चेविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता, आयुक्तांनी सांगितले, राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम आखून दिला होता. आयोगाने आखून दिलेल्या नियम व निर्देशानुसारच प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. या प्रक्रियेत कुणाचा हस्तक्षेप झालेला नाही. पूर्णपणे नियमानुसार प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. प्रभागांची संख्या ३१ झाल्याने त्यात काही ठिकाणी तोडफोड होणारच आहे. त्यामुळे मुद्दाम कुणाला लक्ष्य करून तोडफोड केल्याच्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रारूप प्रभाग रचना तयार करताना प्रगणक गटांची तोडफोड होणार नाही, नैसर्गिक सीमांकनांना धक्का पोहोचणार नाही

Web Title: Format ward composition as per rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.