शेतमालाचे पैसे रोख स्वरु पात
By Admin | Updated: April 3, 2017 00:34 IST2017-04-03T00:34:23+5:302017-04-03T00:34:49+5:30
येवला : शेतकऱ्यांच्या कांद्यासह शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात देण्याचा निर्णय बाजार समितीच्या एका संयुक्त बैठकीत झाल्याने शेतकऱ्यानी आनंद व्यक्त केला आहे

शेतमालाचे पैसे रोख स्वरु पात
येवला : शेतकऱ्यांच्या कांद्यासह शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बाजार समितीच्या एका संयुक्त बैठकीत झाल्याने यापुढे शेतकऱ्यांची धनादेश फेऱ्याच्या विलंबातून सुटका होणार असल्याने शेतकऱ्यानी आनंद व्यक्त केला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजार येथील परवानेधारक खरेदीदार व्यापारी, बाजार समिती सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांची संयुक्त बैठक शनिवारी (दि. १ एप्रिल) येथील बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाली.
मार्चअखेरमुळे बंद असलेले येवला मार्केट सोमवार, दि. ३ एप्रिल पासून, तर अंदरसूल उपबाजारातील शेतमालाचे लिलाव दि. ७ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांनी शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा व शेतमालाची रक्कम रोख स्वरूपात घेऊन जावी, असे आवाहन बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे यांनी केले आहे.
या बैठकीस सभापती उषाताई शिंदे, उपसभापती गणपत कांदळकर, संचालक संतू पा. झांबरे, नंदू आट्टल, सुभाष समदडिया, सचिव डी. सी. खैरनार, व्यापारी गीतेश गुजराथी, उमेश आट्टल, अनिकेत आट्टल, योगेश सोनी, हसन शेख, अंजुम शेख, मनोज समदडिया, प्रणव समदडिया, संकेत पटणी, प्रभाकर ठाकूर, ओंकारेश्वर कलंत्री, जयेश ठाकूर, केशव शिंदे, मनोज कासलीवाल, गोरख पवार, शंकर कदम, गोरख भागवत, शिवनारायण चांडक, शरद श्रीश्रीमाळ यांच्यासह अंदरसूल येथील व्यापारी नामदेव माळी, साहेबराव ढोले, भिकाजी माळी, विलास गाडे, सचिन पैठणकर, बाळनाथ धुमाळ, सागर धुमाळ, निवृत्ती ढोले, सुनील आट्टल, नितीन देशमुख, संजय सेंद्रे, संतोष सोनवणे, शिवाजी ढोले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)