‘संतोषा-भागडी’ची वनसंपदा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:20+5:302021-07-15T04:12:20+5:30

त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेळगाव ढगा परिसरात संतोषा, भागडी हे दोन डोंगर असून, या डोंगरांच्या पाठीमागील बाजूने सारूळ शिवारात गौन ...

The forest resources of 'Santosha-Bhagadi' are in danger | ‘संतोषा-भागडी’ची वनसंपदा धोक्यात

‘संतोषा-भागडी’ची वनसंपदा धोक्यात

Next

त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेळगाव ढगा परिसरात संतोषा, भागडी हे दोन डोंगर असून, या डोंगरांच्या पाठीमागील बाजूने सारूळ शिवारात गौन खनिजांच्या उत्खननासाठी विकासकांकडून सातत्याने स्फोट घडविले जात आहेत. दरम्यान, याप्रकरणी वनप्रेमी, निसर्गप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवीत एल्गार पुकारल्यानंतर वन, महसूल विभागाला खडबडून जाग आली. क्षेत्र गट निश्चिती समितीची जबाबदारी नाशिक पश्चिम वन विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून सोपविण्यात आली आहे. दरम्यान, गर्ग यांनी सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्यासह संतोषा, भागडी डोंगरांना भेटी दिल्या, तसेच सारूळ शिवारातील उत्खननाचीही माहिती जाणून घेतली. यामध्ये संतोषा व भागडी डोंगरमाथ्यावरील नऊ विकसकांनी वन हद्दीपासून सुमारे १५ मीटर अंतरावर, तर तिघा विकासकांनी तर वन हद्द ओलांडून १ मीटर आतपर्यंत वनजमिनीत घुसखोरी केल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आता या उत्खनन प्रकरणाबाबत काय कारवाई करणार, याकडे आता जिल्हावासीयांसह पर्यावरणप्रेमी संघटनांचे लक्ष लागले आहे.

---इन्फो---

डझनभर विकासकांना वनखात्याचा ‘रेड अलर्ट’

वनहद्दीपासून पंधरा मीटर अंतरापर्यंत उत्खनन करणाऱ्या नऊ आणि वनहद्दीत शिरकाव केलेल्या तीन अशा डझनभर विकासकांना वनखात्याने नोटिसा बजावून ‘रेड अलर्ट’ दिला आहे. भारतीय वन कायदा १९२७ मधील कलम- ६३ (ब) नुसार या नोटिसा बजावण्यात आल्याचे पंकज गर्ग यांनी सांगितले. सध्या ज्या जागेत विकासकांकडून ब्लास्टिंग करत उत्खनन सुरू आहे, ती जागा महसूल क्षेत्राच्या ताब्यातील असल्याने सर्वेक्षण अहवालातून याबाबत कारवाईची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे पश्चिम वन विभागाने केली आहे.

Web Title: The forest resources of 'Santosha-Bhagadi' are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.