कंधाणे : बागलाण तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वनविभागाच्या हद्दीतील वनपरिक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याने तालुक्यातील वनसंपदा धोक्यात आली आहे.येत्या काही दिवसात वनक्षेत्रात सुरू असलेली अवैध वृक्षतोड व चराई करणाऱ्यांवर योग्य कार्यवाही न झाल्यास वनविभागाच्या कार्यालयासमोर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा निसर्गमित्र राकेश घोडे व भाजपचे बागलाण तालुकाध्यक्ष संजय देवरे यांनी उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी येडलावर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.शासनाच्या सामाजिक वनीकरण संकल्पनेतून युवकांच्या सहभागातून बागलाण तालुक्यातील डोंगरावर हजारो हेक्टर क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात आली. वनविभागाच्या हद्दीत वृक्षतोड होत आहे.वनविभागाचे दुर्लक्षगावोगावी चराईबंदी व कुºहाडबंदीचा संकल्प करून वनसमितीची स्थापना करून वनांचे संगोपन करण्यात आले. या वनसंपदेचे रक्षण करताना वनसमितीच्या सदस्यांशी अवैध वृक्षतोड व चराई करणाºयांशी खटके उडत आहेत. समितीच्या सदस्यांना वनविभागाच्या अधिकारीवर्गाकडून सहकार्य मिळत नसल्याने व वारंवार उडणाºया वादामुळे या समितीच्या सदस्यांनीसुद्धा दुरून डोंगर साजरे म्हणत यापासून दूर जाणे पसंत केले आहे. ज्या कमर्चारीवर्गावर ही संपदा राखण्याची जबाबदारी आहे तेही टाळाटाळ करत असल्याने तालुक्यातील वनसंपदा धोक्यात आली आहे. वनसमिती व नागरिकांनी मोठ्या कष्टाने जतन केलेली वनसंपदा वनविभागाच्या दुर्लक्षामुळे धोक्यात आली आहे.
बागलाण तालुक्यातील वनसंपदा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:09 IST
कंधाणे : बागलाण तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वनविभागाच्या हद्दीतील वनपरिक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याने तालुक्यातील वनसंपदा धोक्यात आली आहे.
बागलाण तालुक्यातील वनसंपदा धोक्यात
ठळक मुद्देवनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड : कारवाई करण्याची नागरिकांची मागणी