शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

वनविभागाला प्रश्न : अपघातात मृत्युमुखी पडलेला प्राणी नेमका कुत्रा आहे की तरस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 17:12 IST

सोमवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही बाब महामार्गावरून जाणा-या एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने दुचाकी थांबवून प्राण्याचा मृतदेह महामार्गावरून बाजूला केला तसेच मृत्युमुखी पडलेला प्राणी प्रथमदर्शनी तरस या वन्यजिवासारखा दिसत असल्याने तत्काळ त्याने वनविभागाला घटनेची माहिती दिली.

ठळक मुद्देमृत्युमुखी पडलेला प्राणी प्रथमदर्शनी तरस या वन्यजिवासारखा हायवे जरी असला तरी तो रन-वे नाही, हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचेसंध्याकाळपर्यंत साशंकता कायम होती

नाशिक : ओझरपासून काही अंतरावर असलेल्या जऊळके-दिंडोरी शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रविवारी (दि.१७) मध्यरात्रीच्या सुमारास एका मुक्या प्राण्याने जीव गमावला. हा प्राणी कुत्रा व तरस यांच्याशी साम्य दर्शविणारा असल्याने वनविभागाचे अधिक ारी चक्रावले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेला प्राणी नेमका कुत्रा आहे की तरस? असा प्रश्न वनविभागाला पडला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, महामार्ग ओलांडताना रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत जऊळके दिंडोरी शिवारात एका प्राण्याचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही बाब महामार्गावरून जाणा-या एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने दुचाकी थांबवून प्राण्याचा मृतदेह महामार्गावरून बाजूला केला तसेच मृत्युमुखी पडलेला प्राणी प्रथमदर्शनी तरस या वन्यजिवासारखा दिसत असल्याने तत्काळ त्याने वनविभागाला घटनेची माहिती दिली. सुमारे दोन तासांनंतर घटनास्थळी दिंडोरी-चांदवड वनपरिक्षेत्रातील कर्मचारी दाखल झाले. त्यांनी मृत झालेल्या प्राण्याचा पंचनामा केला; मात्र हा प्राणी कुत्रा आहे की तरस? असा प्रश्न त्यांच्यापुढेही कायम होता. शवविच्छेदनानंतर पशुवैद्यकीय अधिका-यांचे यावर मत घेऊन अपघातात मरण पावलेला प्राणी नेमका कुठल्या जातीचा आहे यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. घटनास्थळी पोहचलेल्या काही कर्मचा-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर प्रथमदर्शनी मृत्युमुखी पडलेला प्राणी कुत्राच आहे, असा दावा केला. मात्र वरिष्ठ अधिका-यांनी याबाबत साशंकता बाळगत या प्राण्याच्या मृतदेहाचे छायाचित्र बघून तरसाच्यादेखील काही खाणाखुणा दिसत असल्याचे सांगितले. तसेच्या त्याचे कु त्र्याशीदेखील साम्य असल्याचा निष्कर्ष नोंदविला. त्यामुळे अपघातात मरण पावलेला प्राणी नेमका कुठला याबाबत संध्याकाळपर्यंत साशंकता कायम होती.धावपट्टी नव्हे महामार्गमहामार्गावरून भरधाव वेगाने वाहनचालक वाहने दामटवितात. यामुळे अनेकदा वाहनावरील नियंत्रण सुटून पादचा-यांसह मुक्या प्राण्यांना रस्त्यावर जीव गमवावा लागतो. त्यामुळे वाहनचालकांनी महामार्गाला धावपट्टी समजून वाहने चालविणे टाळावे. हायवे जरी असला तरी तो रन-वे नाही, हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. कमाल वेगमर्यादेचे महामार्गावर पालन करत सुरक्षितरीत्या वाहतूक करून स्वत:चा व इतरांचाही जीव वाचविण्याचा प्रयत्न करावा. विशेषत: रात्रीच्या वेळी महामार्गावरून प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन महामार्ग पोलीस, वनविभाग, प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाwildlifeवन्यजीवAccidentअपघातforest departmentवनविभागhighwayमहामार्ग