ब्रम्हगिरी उत्खनन प्रकरणाची वनविभागाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST2021-05-30T04:12:49+5:302021-05-30T04:12:49+5:30

या उत्खननामुळे पर्यावरणासह जैवविविधतेला काही धोका पोहोचतो आहे काय तसेच वनविभागाच्या जागेत अतिक्रमण झाले आहे काय, याची पाहणी ...

Forest Department inspects Brahmagiri excavation case | ब्रम्हगिरी उत्खनन प्रकरणाची वनविभागाकडून पाहणी

ब्रम्हगिरी उत्खनन प्रकरणाची वनविभागाकडून पाहणी

या उत्खननामुळे पर्यावरणासह जैवविविधतेला काही धोका पोहोचतो आहे काय तसेच वनविभागाच्या जागेत अतिक्रमण झाले आहे काय, याची पाहणी नाशिक उपवन संरक्षक पंकज गर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नुकतीच केली. ज्या ठिकाणी सुरुंग लावून जेसीबीद्वारे खोदाई केली गेली, त्या ठिकाणी भेट देऊन जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांच्या पाहणीत जे काम चालू होते ते गट नंबर १२३ या मालकी जागेत चालू होते. वनविभागाच्या हद्दीपासून गटनंबर १२३ हे अंतर १० मीटरवर आहे.

आपली हद्द सोडून वन विभागाच्या हद्दीत अतिक्रमण करू नये व पर्वताला तसेच जैव विविधतेला धोका पोहोचेल, पर्यावरणाचा समतोल बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नये, असे अधिकाऱ्यांनी यावेळी जागा मालकाला बजावले. या पाहणी दौऱ्यात सहायक उपवन संरक्षक गणेश झोये, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, सुनील झोपे, मंगेश शेळके आदी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Forest Department inspects Brahmagiri excavation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.