शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वनविभाग शासकीय कार्यालयाची दुरवस्था वणी : जप्त वाहनांसह लाकडांची सुरक्षितता वाºयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:20 IST

वणी : जप्त केलेल्या वनसंपत्तीची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या वनविभागाच्या शासकीय इमारती मालाचे विक्री केंद्रातील कार्यालय भुईसपाट होण्याच्या स्थितीत आहे.

ठळक मुद्देसाडेसात एकर जागा कार्यालय केव्हा कोसळेल याचा नेम नाही

वणी : जप्त केलेल्या वनसंपत्तीची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या वनविभागाच्या शासकीय इमारती मालाचे विक्री केंद्रातील कार्यालय भुईसपाट होण्याच्या स्थितीत असून, एमडी रूम या कार्यालयाचीही तशीच स्थिती झाल्याने कार्यालयीन कामकाज आवारात करण्याची वेळ वनविभागाच्या घटकांवर आली आहे.वणी-दिंडोरी रस्त्यावर संखेश्वर मंदिरालगत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षेत्राला खेटून वनविभाग पूर्व भाग यांची साडेसात एकर जागा असून, शासकीय इमारती मालाचे विक्री केंद्र या ठिकाणी कार्यान्वित आहे. वनपरिमंडल अधिकारी १, वनरक्षक ३, वनमजूर ३ असा अधिकारी व कर्मचारी वर्ग कामकाज सांभाळतात. १९६५ साली हे विक्र ी केंद्र याठिकाणी सुरू झाले. मात्र २५० मीटर अंतरालासंरक्षक भिंत नाही तसेच कार्यालय केव्हा कोसळेल याचा नेम नाही. एमडी रूम अखेरच्या घटका मोजत आहे. ही रूम म्हणजे लाकडांचा लिलाव होतो तेव्हा ती रक्कम जमा करून घेण्याची जागा. जप्त केलेल्या लाकडांचा लिलाव तीन ते चार महिन्यांनंतर वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने करण्यात येतो. दरम्यान, नमूद कार्यालयाला टिंबर डेपो असेही संबोधण्यात येते. दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकक्षेत सदर कार्यालय येते. वनविभाग पूर्व भाग नाशिक व प्रादेशिक दिंडोरी अशी ओळख असलेल्या विक्री केंद्राचे कार्यालय अखेरच्या घटका मोजत असल्याने कार्यालय आवारातच थाटण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करता अपेक्षित कारवाईचा सूर उमटतो आहे.दिंडोरी, कळवण व सुरगाणा असे तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाºया या केंद्रात नमूद ठिकाणाहून बेकायदा लाकूड वाहतूक करणारी वाहने जप्त करून याठिकाणी ठेवण्यात येतात. त्या जप्त ऐवजाची देखभाल व सुरक्षितता याकडे लक्ष ठेवणे अशी जबाबदारी आहे. जप्त केलेली साठ वाहने असून, १८ दुचाकी व ४२ चारचाकी अशी वर्गवारी आहे. कोट्यवधी रुपये किमतीचे लाकडे याठिकाणी आहेत.