शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाचा दावा : नेटिझन्सकडून फिरणारे ‘बिबट्या दर्शन’चे मेसेज निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:08 IST

बिबट्या दिसल्याचे बिनबुडाचे निराधार मेसेज सोशलमिडियावर टाकून बेजबाबदार वर्तन करू नये, अन्यथा अफवा पसरविल्याप्रकरणी थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही आता वनविभागाकडून देण्यात आला

ठळक मुद्देकुठल्याही प्रकारचा ‘अ‍ॅलर्ट’ वनविभागाने दिलेला नाहीवनविभागाचे तीन गस्तीपथक

नाशिक : सातपूरला बिबट्या फिरतोय..., पांगरे मळ्यात बिबट्या ूदिसला... अहो, साहेब मुंबईनाका येथे बिबट्याने नासर्डीत उडी घेतल्याचे पाहिले... कर्मयोगीनगरमध्ये बिबट्याचा संचार, कुत्री खूप भुंकत आहेत... साहेब तिडके कॉलनीत बिबट्या फिरताना दिसतोय पिंजरा तत्काळ लावा..., असे एक ना अनेक फोन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संध्याकाळी सात वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत सुरूच आहे, यामुळे वनविभागाच्या तीन गस्ती पथक शहरात ठिकठिकाणी भेट देऊन खात्री करत असताना नागरिकांच्या एकाही ‘कॉल’मध्ये तथ्य आढळून आले नाही, असे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.वनविभागाचे दक्षता पथकासह नाशिक पश्चिम विभागाचे दोन असे एकूण तीन गस्तीपथक आॅन रोड असून रेस्क्यू टीमचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. यामळे नागरिकांनी विनाकारण घबराट पसरवू नये, तसेच बिबट्या दिसल्याचे बिनबुडाचे निराधार मेसेज सोशलमिडियावर टाकून बेजबाबदार वर्तन करू नये, अन्यथा अफवा पसरविल्याप्रकरणी थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही आता वनविभागाकडून देण्यात आला आहे. कोणतीही खात्री न करता, एखाद्या परिसराचे नाव टाकून अफवा पसरविल्या जाता आहेत. या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये आणि वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे. खोट्या पोस्ट व्हायरल करणार्यांवर आता थेट गुन्हे दाखल करण्याची तयारी नाशिक पश्चिम वनविभागाने केली असल्याचे भदाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नागरिकांनी पुरेशी खबरदारी नक्कीच घ्यायला हवी, सतर्कता बाळगून आपली सुरक्षितता टिकवावी, मात्र अशाप्रकारे बेभान होऊन विनाकारण सोशलमिडियाचा गैरवापर करून परिसरात घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल एम.बी.पाटील, भदाणे यांच्या नेतृत्वाखाली रात्रपाळीकरीता तीन पेट्रोलिंग वाहनांद्वारे २ वनपाल, प्रत्येकी ३ वनरक्षकांचे पथक गस्तीवर आहेत. वनविभागाचे सर्व गस्तीपथक सतर्क असून सातत्याने पोलीस नियंत्रण कक्षाच्या संपर्कातही आहे. कुठल्याहीप्रकारचा ‘अ‍ॅलर्ट’ वनविभागाने दिलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांच्या मॅसेजकडे सपेशल दुर्लक्ष करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल