शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राठी फार्म हाऊसमधील 'रान' पेटले; चार बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 16:53 IST

अग्नीशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सातपुर उपकेंद्रावरील दोन बंबांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले.

ठळक मुद्देदोन तास जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझविली

नाशिक : येथील राठी फार्म हाऊसच्या परिसरातील ह्यरानह्णमधील वाळलेल्या गवताला रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. परिसरात वारा वेगाने वाहत असल्याने क्षणार्धात ह्यवणवाह्ण भडकला. त्यामुळे फार्महाऊस मालकाने अग्नीशमन दलाला माहिती देत मदत मागितली. घटनेची माहिती मिळताच सातपुर, सिडको, नाशिकरोड या उपकेंद्रांवरुन बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशमन दलाला यश आलेसातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या राठी फार्म हाऊसच्या परिसरात असलेल्या रानातील गवताला दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला आगीचे स्वरुप कमी होते त्यामुळे फार्महाऊसच्या कर्मचाऱ्यांनी झाडांच्या फांद्याच्या सहाय्याने झोडपणी करत पेटलेले गवत विझविण्यास सुरुवात केली; मात्र गवत वाळलेले आणि परिसरात वेगाने सुटलेला वारा यामुळे आगीने रुद्रावतार धारण केला. आगीचे स्वरुप वाढत असल्याचे लक्षात येताच अखिल राठी यांनी त्वरित अग्नीशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सातपुर उपकेंद्रावरील दोन बंबांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले. पाण्याचा मारा करत फार्महाऊसमधील मोठ्या मोकळ्या भुखंडावरील वाळलेल्या गवताला लागलेली आग विझविण्यास सुरुवात केली. आग मोठी असल्याने या जवानांच्या मदतीला सिडको व नाशिकरोड उपकेंद्रांवरील प्रत्येक एक बंबासह जवानांची अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली. चार बंबांच्या सहाय्याने सुमारे दहा ते पंधरा जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझविली.या फार्महाऊसच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रानगवत उंचचउंच वाढलेले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करत ज्वलनशील वस्तु फेकल्यामुळे फार्महाऊसमध्ये वणवा पेटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

 

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलMIDCएमआयडीसीfireआगforestजंगल