पिंपळणारे सोसायटीच्या अध्यक्षपदी परदेशी
By Admin | Updated: January 28, 2017 00:46 IST2017-01-28T00:45:57+5:302017-01-28T00:46:44+5:30
पिंपळणारे सोसायटीच्या अध्यक्षपदी परदेशी

पिंपळणारे सोसायटीच्या अध्यक्षपदी परदेशी
वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील पिंपळणारे येथील नेत्रावती विविध कार्यकारी सोसायटीचा अध्यक्षपदी महंद्रसिंग परदेशी याची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी परदेशी याचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आर. पी. जाधव यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. महेंद्रसिंग परदेशी यांच्या अर्जावर सूचक म्हणून बाळासाहेब कोठुळे, तर अनुमोदक म्हणून एकनाथ अहेर यांनी स्वाक्षरी केली.
नूतन संचालक नारायण कोठुळे, बाळासाहेब कोठुळे, रामचंद्र कोठुळे, पांडुरंग कोठुळे, एकनाथ अहेर, माधव गुमणार, बाळासाहेब ठाकरे, संजय पवार, अशोक कोठुळे, बबेबाई धनाईत, पूजा हटकर, पंडित यशवंते आदिंसह माजी अध्यक्ष अनिल कोठुळे, कादवाचे माजी संचालक मधुकर कोठुळे, सुभाष अहेर, माधव कोठुळे, शिवाजी कोठुळे, शिवनाथ लगड, दिलीप कोठुळे, पुंडलिक ठाकरे, सुरेश यशवंते, समाधान गांगुर्डे, गोरख आंबेकर, अनिल गुमणार, राहुल परदेशी, एकनाथ खैरनार, सुभाष पवार आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांना सचिव विष्णू गांगुर्डे व संजय पवार यांनी सहाय्य केले. (वार्ताहर)