विदेशी मद्य जप्त

By Admin | Updated: August 30, 2016 00:58 IST2016-08-29T22:23:16+5:302016-08-30T00:58:33+5:30

विदेशी मद्य जप्त

Foreign liquor seized | विदेशी मद्य जप्त

विदेशी मद्य जप्त

सुरगाणा : सुरगाणा - उंबरठाण - वासदा (गुजरात) या महामार्गावरील पांगारणे येथून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात साठ हजार रुपयांचे देशी-विदेशी मद्य पोलिसांनी संशयित आरोपी सहित जप्त केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास पाटील यांना तालुक्यातील पश्चिमेला गुजरात सीमेवरील हडकाईचोंड जवळील पांगारणे येथे गुजरात राज्यातील दमण येथील बनावट देशी-विदेशी मद्य विकले जात असल्याची खबर भ्रमणध्वनीद्वारे मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संशयित आरोपी गुलाब लहानू ठाकरे (रा. पांगारणे) याच्या रहात्या घराची झडती घेतली असता गुरांच्या गोठ्यात चाऱ्याखाली हा मद्याचा साठा आढळून आला. याबाबत पोलीस निरीक्षक चंद्रकांत गांगुर्डे, उपनिरीक्षक सचिन गवळी, हेमंत भालेराव, चंद्रकांत दवंगे, मोहन चारोस्कर, मधुकर पवार, चालक जोपळे, आदिंनी कारवाई केली. (वार्ताहर)

Web Title: Foreign liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.