विदेशी पाहुणे रवाना; यजमान पक्ष्यांचा मुक्काम !
By Admin | Updated: March 1, 2017 00:51 IST2017-03-01T00:51:31+5:302017-03-01T00:51:52+5:30
नाशिक : थंडी परतली असली तरी राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य अर्थात राज्याचे भरतपूर स्थलांतरित पक्ष्यांनी अजूनही गजबजलेले आहे.

विदेशी पाहुणे रवाना; यजमान पक्ष्यांचा मुक्काम !
नाशिक : थंडी परतली असली तरी राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य अर्थात राज्याचे भरतपूर स्थलांतरित पक्ष्यांनी अजूनही गजबजलेले आहे. यामुळे पक्षिप्रेमींची ‘वीकेण्ड’ला गर्दी वाढत आहे. नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षीसंमेलनाचा कालावधी सप्टेंबर ते डिसेंबर जरी असला तरी सध्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. अभयारण्याचा झालेला विकास, न्याहारीची सोय, उद्यान, मूलभूत सोयीसुविधांमुळे पर्यटकांच्या पसंतीचे ‘डेस्टिनेशन’ बनले आहे. सध्या विविध प्रजातींचे एक डझन पक्षी अभयारण्यात मुक्तपणे विहार करताना दिसून येतात. यामध्ये देशी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या जास्त आहे. एकूणच नांदूरमधमेश्वर अभयारण्याकडे पक्षी येण्याचे प्रमाण यंदा जास्त होते. त्यामुळे पक्षिप्रेमींसाठी जणू ही पर्वणीच ठरली. पक्षिसंमेलनाचा कालावधी संपला असला तरीदेखील अभयारण्यात काही पक्ष्यांचा मुक्काम अजूनही पहावयास मिळत असल्याने पक्षिप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ‘वीकेण्ड प्लॅन’साठी येथील पक्षी अभयारण्याला हौशी व अभ्यासू पक्षिप्रेमींकडून पसंती दिली जात आहे. आॅक्टोबर अखेरच्या आठवड्यापासून पक्ष्यांची संख्या अभयारण्यामध्ये वाढू लागली होती. डिसेंबरअखेरपर्यंत विदेशी पाहुणे येथील जलाशयावर मुक्कामी होते. त्यानंतर पाहुणे परतीच्या प्रवासाला लागले असले तरी यजमानाच्या भूमिकेत असलेल्या स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास संमेलनस्थळी अद्याप कायम आहे. (प्रतिनिधी)