जबरदस्तीने लिहून घेतली धमकीपत्रे

By Admin | Updated: July 16, 2017 00:16 IST2017-07-16T00:16:36+5:302017-07-16T00:16:51+5:30

अजीम गुलाम मुर्तुझा शेख हा फिर्यादी अल्ताफ बशीरखान पठाण यांच्याकडून निनावी धमकीपत्रांचे बळजबरीने लेखन करून घेत असल्याची धक्कादायक माहिती शनिवारी (दि.१५) पोलीस तपासात पुढे आली

Forcibly wrote threats | जबरदस्तीने लिहून घेतली धमकीपत्रे

जबरदस्तीने लिहून घेतली धमकीपत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मुलांना नोकरीला लावून देतो, माझी महापालिका आयुक्तांशी ओळख आहे, असे सांगून दोन सेवानिवृत्तांना एकूण ३२ लाख ३७ हजारांना गंडविणाऱ्या रॅकेटमधील म्होरक्या अजीम गुलाम मुर्तुझा शेख हा फिर्यादी अल्ताफ बशीरखान पठाण यांच्याकडून निनावी धमकीपत्रांचे बळजबरीने लेखन करून घेत असल्याची धक्कादायक माहिती शनिवारी (दि.१५) पोलीस तपासात पुढे आली  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजीम व त्याचा साथीदार जहीर बनेमिया शेख, राहुल सहाणे यांनी अल्ताफ बशीरखान पठाण यांना धमकावून त्यांच्याकडून बळजबरीने निनावी व्यक्तींसाठी अनेकदा धमकीपत्र लिहून घेतले. तसेच मुलांना नोकरीला लावून देण्याच्या आमिषापोटी पठाण यांच्याकडून उकळलेले २६ लाख ५० हजार रुपयांमधून एक रुपयाही देणार नाही आणि तुझा खून करू’ असे धमकावून निनावी पत्र लेखनासाठी दबाव वाढविल्याचे पठाण यांनी पोलिसांना समक्ष येऊन माहिती दिली. या संशयित आरोपींनी मजहर शेख यांनाही आमिष दाखवून पावणे सहा लाख रुपये उकळले आहे. गुरुवारी (दि.१३) तिघा संशयिताना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि.१९) तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अजीम हा फिर्यादी पठाण यांच्याकडून जबरदस्तीने निनावी धमक्यांचे पत्र लिहून घेत असल्याचेही समोर आले आहे. अजीम यांनी पठाण यांच्याकडून निनावी धमकीपत्र लिहून घेत मुख्यालयात सेवेत असलेल्या व जुन्या नाशिकमधील हसन पठाण यांनाही धमकीपत्र पाठविले होते.
राजकीय पक्षाशी संबंध
सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी जहीर बनेमिया शेख हा राजकीय पक्षाशी संबंधित आहे. सुरुवातील श्रमिक सेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या संपर्कात आला होता. काही दिवस श्रमिक सेनेचा पदाधिकारी म्हणून मिरविल्यानंतर या पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मिरवू लागला होता. राष्ट्रवादीच्या तिकिटावर प्रभाग २३मधून पंचवार्षिक निवडणूकही शेख याने लढविली होती.
मशिदींमध्ये पाठविली निनावी पत्रे
पोलीस कर्मचारी पठाण यांच्यावर विविध प्रकारचे खोटे आरोप करून अजीमने त्याचा साथीदार सहाणेच्या मदतीने मशिदींमध्येही खोटी आवाहन पत्रे पाठविल्याचे उघडकीस आले होते. या पत्रातून त्याने पठाण हे सुन्नी पंथीय नसून ते सुन्नी मुस्लीम समुदायाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता.

Web Title: Forcibly wrote threats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.