विवाहितेचे अपहरण करून जबर मारहाण

By Admin | Updated: February 1, 2016 23:22 IST2016-02-01T23:17:40+5:302016-02-01T23:22:05+5:30

विवाहितेचे अपहरण करून जबर मारहाण

Forced to abduct marriage | विवाहितेचे अपहरण करून जबर मारहाण

विवाहितेचे अपहरण करून जबर मारहाण

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या एका विवाहितेच्या पूर्व प्रियकराने अपहरण करून मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़३१) दुपारच्या सुमारास घडली़ या विवाहितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी सातपूर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे़
शिवाजीनगरमधील एकोणीस वर्षीय विवाहिता सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला जाते़ वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या या विवाहितेस तिचा पूर्वीचा प्रियकर संशयित जितेंद्र राजू देसले (रा़ आर्वी, जि़ धुळे) याने रविवारी दुपारच्या सुमारास फोन करून तिला भेटण्यासाठी बाहेर बोलावले़ संशयित देसले व त्याच्या पाच-सहा साथीदारांनी बळजबरीने तिला चारचाकीत बसवून निर्जनस्थळी नेले़ यानंतर मारहाण व धक्काबुक्की करून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अशोकनगरला सोडून दिले़ त्यानंतर घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले़ फरार संशयित जितेंद्र देसले व त्याचे दोन साथीदार यांना आर्वीतून ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Forced to abduct marriage