नेचर क्लबच्या वतीने फुलपाखरे दर्शन उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 23:13 IST2016-03-16T23:09:41+5:302016-03-16T23:13:56+5:30
नेचर क्लबच्या वतीने फुलपाखरे दर्शन उपक्रम

नेचर क्लबच्या वतीने फुलपाखरे दर्शन उपक्रम
नाशिक : नेचर क्लब आॅफ नाशिकतर्फे फुलपाखरू संवर्धन दिनानिमित्त ‘चला फुलपाखरू बघूया’ हा उपक्रम नुकताच गोदापार्क, सामाजिक वनीकरण परिसरात झाला.
एका सर्व्हेमध्ये देशातील फुलपाखरांची संख्या २० टक्क्यांनी कमी झाली असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यादृष्टीने फुलपाखरांचा अभ्यास केला असता अनेक वनस्पती व वृक्ष नष्ट झाल्याने अनेक फुलपाखरांच्या जातींवर त्याचा परिणाम झाल्याचे आढळून आले. या उपक्र मात एका दिवसात वीस जातीची फुलपाखरे बघण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळाली. शेतीसाठी वापरली जाणारी किटकनाशके हे फुलपाखरांच्या जिवावर उठले आहे. सिमेंट जंगलाच्या वाढत्या पसाऱ्यामुळे फुलपाखरांच्या काही जाती धोक्यात आल्या आहेत. याप्रसंगी प्रा. आनंद बोरा, विठ्ठल सोनवणे, प्रमिला पाटील, सागर बनकर, दर्शन घुगे, आशिष बनकर, आकाश जाधव, धनंजय बागड, सलोनी वाघमारे, सायली महाजन, नेहा पाटील, अमोल उबाळे, गणेश जाधव, प्रियंका काठे, क्रिशी बोरा आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)