निवृत्तिनाथांच्या चरणी दिंड्या विसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:15 PM2020-01-19T23:15:24+5:302020-01-20T00:09:47+5:30

संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज झाली आहे. देवस्थान ट्रस्टसह प्रशासकीय यंत्रणेचे नियोजन पूर्ण झाले असून, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत. यामुळे कुंभमेळ्याची अनुभूती शहरात दाखल होणाऱ्यांना होत आहे.

In the footsteps of Nivrishnath, the poles were laid | निवृत्तिनाथांच्या चरणी दिंड्या विसावल्या

त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवासाठी इगतपुरी येथून जोग महाराज भजनी मठाची निघालेली दिंडी.

Next
ठळक मुद्देत्र्यंबकनगरीत भक्तीचा महापूर : यात्रोत्सवासाठी देवस्थान ट्रस्ट सज्ज

त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज झाली आहे. देवस्थान ट्रस्टसह प्रशासकीय यंत्रणेचे नियोजन पूर्ण झाले असून, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत. यामुळे कुंभमेळ्याची अनुभूती शहरात दाखल होणाऱ्यांना होत आहे.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध गंगाद्वाराच्या गुहेत विधिलिखितानुसार अनावधानाने निवृत्तिनाथांचा नाथ सांप्रदायातील गहिनीनाथ यांच्या गुहेत प्रवेश झाला. तेथे भेटलेल्या गुरु गहिनीनाथ यांची सेवा निवृत्तिनाथ करू लागले. यानंतर गहिनीनाथ प्रसन्न झाले आणि त्यांनी निवृत्तिथांना नाथ सांप्रदायाची दीक्षा दिली. त्यानंतर नाथ सांप्रदायाच्या विस्तारात निवृत्तिनाथांचे अनमोल योगदान लाभल्याचे जाणकार सांगतात. या पार्श्वभूमीवर साजरा करण्यात येणाºया निवृत्तिनाथ यात्रोत्सवास त्र्यंबकेश्वर येथे नाथपंथीय वारकºयांची मांदियाळी असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रोत्सवासाठी प्रशासकीय व देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले आहे.
शहर पताका, दिंड्यांनी भक्तिमय झाले आहे. यात्रोत्सवाची सुरुवात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय महापूजेने करण्यात येणार आहे तसेच यात्रा कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. दरम्यान, जायखेडा येथील श्रीकृष्ण महाराज यांच्या दिंडीचा रिंगण सोहळा अंजनेरी येथील ब्रह्माव्हॅली शैक्षणिक संकुलातील पटांगणात भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.

..असा आहे पोलीस फौजफाटा
पोलीस प्रशासनाने पुरेसा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अपर पोलीस अधीक्षक शर्र्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली दोन डीवायएसपी, चार पोलीस निरीक्षक, २७ एपीआय व पीएसआय, १४८ पोलीस कर्मचारी, ४२ महिला पोलीस, २७ वाहतूक पोलीस, १९७ पुरु ष होमगार्ड, १२५ महिला होमगार्ड याशिवाय शीघ्र कृती दलाचे जवान, दंगल नियंत्रण कक्षाचे जवान सर्व परिस्थितीवर नियंत्रन ठेवून असणार आहेत.

यात्रोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल
संत निवृत्तिनाथ यात्रोत्सवासाठी हजारो भाविक शहरात दाखल
होत असतात. यामुळे व्यावसायिकांसाठी ही पर्वणी ठरत असून, लाखो रुपयांची उलाढाल होत असते. या यात्रेत करोडो रु पयांची उलाढाल होत असते. सध्या थंडीची वाढल्याने उबदार गरम कपडे विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसेच अनेक ठिकाणी हॉटेल्स, प्रसाद, फराळाचे पदार्थ आदींची दुकाने
थाटलेली दिसत आहेत.

गजानन महाराज
संस्थानचे दायित्व
या यात्रेत संत गजानन महाराज संस्थानतर्फे एकादशी व द्वादशी असे दोन दिवस यात्रेसाठी येणाºया भाविकांना फराळ, भोजन चोवीस तास खुले असते तर दिंड्यांमधील भजनी मंडळांना टाळ, पखवाज, वीणा आदींचे मोफत वाटप केले जाते. त्याचप्रमाणे गरीब वारकºयांना शर्ट, धोतर, टोपी व महिलांना साडी, पातळ आदी कपडेही मोफत दिले जातात.

यात्रोत्सवासाठी परिवहन महामंडळाच्या ३५० ते ४०० बसेसचे नियोजन केले असून, नगर परिषदेकडे यात्रेचे यजमानपद असल्याने निर्मलवारीसह शहराच्या संपूर्ण स्वच्छतेसाठी कर्मचारी तत्पर आहेत. तसेच कुशावर्तावर जीवरक्षक दल तैनात आहे. सुमारे ६०० ते ६५० दिंड्या सायंकाळपर्यंत शहरात दाखल झाल्या आहेत.
- डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी, नगर परिषद

Web Title: In the footsteps of Nivrishnath, the poles were laid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.