मॉल संस्कृ ती फोफवावी या दृष्टीनेच अन्नसुरक्षा कायदा
By Admin | Updated: November 15, 2014 01:00 IST2014-11-15T00:59:14+5:302014-11-15T01:00:01+5:30
मॉल संस्कृ ती फोफवावी या दृष्टीनेच अन्नसुरक्षा कायदा

मॉल संस्कृ ती फोफवावी या दृष्टीनेच अन्नसुरक्षा कायदा
नाशिक : सामान्य व्यावसायिकाच्या समस्या समजून न घेता केवळ मॉल संस्कृ ती फोफवावी या दृष्टीनेच अन्नसुरक्षा कायदा बनविला गेला असल्याचा आरोप महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी येथे केला़
गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृह येथे नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी होते़
भोगले म्हणाले, एलबीटी तसेच अन्नसुरक्षा कायद्यातील जाचक अटींबाबत ते करणाऱ्यांची जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु त्यांची मानसिकता जाणून घेतल्याशिवाय व ती बदलल्याशिवाय या कायद्यामध्ये बदल होणार नाही़ तसेच आपल्यातून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी या कायद्यांना का मान्यता देतात हे पाहण्याची वेळ आली आहे़ नवे सरकार सर्वांना बरोबर घेऊन बदल घडवून आणण्याचे आश्वासन देत आहे, तर आपण व्यापाऱ्यांनीही सरकारने आपणावर विश्वास ठेवावा असा व्यवसाय करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले़ अरुण गुजराथी म्हणाले, व्यापार केवळ पैशांवर चालत नाही, त्याला पैशाच्या भांडवलाप्रमाणे विश्वासाचेही भांडवल लागते़ ग्राहक हे पैसा कमावण्याचे साधन नाही, तर व्यवसाय ही एक सेवा आहे़ यामुळे ग्राहकाला न फसवता आपला व्यवसाय वाढविण्याची गरज आह़े शासन हे करांशिवाय चालू शकत नाही़ उद्या शासनाने एलबीटी बंद केला तरी दुसरा कर सुरू करेलच. यासाठी सर्व संघटनांची एकजूट व्हावी़ स्पर्धा आणि सहकार्य हेच आपले जीवन आहे़ संघटनेने स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करण्याचा प्रयत्न करावा़ याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते सभासद सूचीचे प्रकाशन करण्यात आले़ तसेच संघटनेचे अध्यक्ष अरुण जातेगावकर यांचा विशेष सत्कार अरुण गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी प्रवीण मसालेचे संचालक हेमंत राठी, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, दिलीप साळवेकर, घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, राजन दलवानी, नंदकुमार कर्पे, चंद्रकांत दीक्षित आदि उपस्थित होते़