कोरोना पाठोपाठ आता जिल्ह्यात 'सारी'ची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 10:34 PM2020-05-28T22:34:19+5:302020-05-29T00:10:18+5:30

जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना त्यात आता 'सारी' रुग्णाचीही भर पडली असून, या आजाराने औरंगाबाद येथे घेतलेले बळी पाहता, सारीचे रुग्ण सापडताच त्याची कोविड टेस्ट करून तत्काळ उपचार केले जात आहेत.

Following Corona, there is now a fear of 'sari' in the district | कोरोना पाठोपाठ आता जिल्ह्यात 'सारी'ची भीती

कोरोना पाठोपाठ आता जिल्ह्यात 'सारी'ची भीती

Next
ठळक मुद्देतपासणीत १७ रुग्ण : आरोग्य विभागाची तत्परता

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना त्यात आता 'सारी' रुग्णाचीही भर पडली असून, या आजाराने औरंगाबाद येथे घेतलेले बळी पाहता, सारीचे रुग्ण सापडताच त्याची कोविड टेस्ट करून तत्काळ उपचार केले जात आहेत.
कोरोना रुग्णासारखीच लक्षणे असणाऱ्या सारी आजारात प्रामुख्याने श्वास घेण्यास त्रास होणे, खूप ताप, सर्दी, खोकला लागणे, फुप्फुसात सूज येणे, अल्पावधीत रुग्ण गंभीर होणे असे लक्षणे आहेत, त्यामुळे सध्या कोरोनासारखीच लक्षणे दिसणाºया परंतु कोरोना नसणाºया रुग्णाला कोविडप्रमाणेच उपचार करण्यावर भर दिला जात आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते सारी हा आजार यापूर्वीदेखील होता, फक्त त्याचे निदान होत नव्हते, आता कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केल्यावर प्रामुख्याने सारी आजाराचे गांभीर्य लक्षात येऊ लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रत्येक गावात आरोग्य विभागाने कोरोना केअर सेंटर सुरू करून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सारी आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत, या आजाराच्या रुग्णांची स्वतंत्र नोंद ठेण्यात येत असून, कालपर्यंत १७ रुग्ण सारी आजाराने बाधित असल्याचे सांगण्यात आले, त्यात चांदवडला तीन व कळवणला १४ रुग्ण आढळून आले, त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मात्र सारी आजाराने जिल्ह्यात डोके वर काढू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सारी आजाराचे विषाणू अनेक प्रकारचे असल्याने त्याला अगोदर प्रतिबंध करणे अवघड असले तरी या रुग्णांना वेळेवर जलदगतीने उपचार मिळणे हेच महत्त्वाचे मानले जाते.
अशा प्रकारचे रुग्ण सापडल्यास त्याचेही घश्याचे नमुने घेऊन ते कोरोना प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असल्यास कोरोना प्रतिबंधित उपाय केले जात आहेत, तर निगेटिव्ह असल्यास सारीवर उपचार केले जात आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या मते, डेंग्यू, स्वाइन फ्लूच्या साथीच्या काळातही सारी आजार कायम होता, मात्र या साºया आजारावर टॉमी फ्लूची औषधे गुणकारी ठरली होती, आताही कोरोनाबाधित किंवा सारी आजाराने पीडित रुग्णाला दोन टॉमी फ्लू दिले जात आहे. औरंगाबाद येथे सारीने अनेक बळी घेतले आहेत, नाशिक जिल्ह्यात मात्र सारीचे रुग्ण झपाट्याने बरे होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

Web Title: Following Corona, there is now a fear of 'sari' in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.