पूरग्रस्तांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार
By Admin | Updated: August 14, 2016 00:20 IST2016-08-14T00:18:46+5:302016-08-14T00:20:35+5:30
माणिकराव ठाकरे : चांदोरी, सायखेड्यासह शिंगवे येथे पाहणी; नुकसानग्रस्तांनी मांडल्या व्यथा

पूरग्रस्तांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार
निफाड : तालुक्यातील पूरग्रस्त चांदोरी, सायखेड्यासह इतर गावात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी आज, शनिवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ठाकरे यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा शासनदरबारी मांडण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
प्रारंभी ठाकरे यांनी चांदोरी येथे भेट दिली. तेथील बेघर वस्ती, गावातील नुकसानग्रस्त घरे, दुकाने, तसेच नुकसान झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र या भागाची पाहणी केली. चांदोरी आरोग्य केंद्राची परिस्थिती माजी आमदार दिलीप बनकर यांनी निदर्शनास आणून दिली. सरपंच संदीप टर्ले यांनी नुकसानग्रस्त भागाची माहिती दिली. यावेळी माजी आमदार दिलीप बनकर, सुनील आव्हाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शरद अहेर, दिगंबर गिते, गोकुळ गिते, सिद्धार्थ वनारसे, निर्मलाताई खर्डे, मधुकर शेलार, साधना जाधव, सुनील निकाळे, साहेबराव ढोमसे, शकील शेख, निफाडचे तहसीलदार विनोद भामरे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका कृषी अधिकारी ढेपे
आदिंसह अधिकारीवर्ग उपस्थित
होता. चांदोरीनंतर ठाकरे यांनी सायखेडा येथे पिंपळगाव मार्केट कमिटीचा उपबाजाराचा भाग, बेघर वस्ती, पूरग्रस्त भाग गंगानगर या ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व माहिती घेतली. (वार्ताहर)