चारा आगीच्या भक्ष्यस्थानी

By Admin | Updated: April 4, 2016 23:44 IST2016-04-04T23:43:06+5:302016-04-04T23:44:06+5:30

डुबेरेवाडी : झापही खाक; ८० हजारांचे नुकसान

Fodder firefighters | चारा आगीच्या भक्ष्यस्थानी

चारा आगीच्या भक्ष्यस्थानी

 सिन्नर : तालुक्यातील डुबेरेवाडी येथे गावालगत असलेल्या वस्तीवरील वैरणीला आग लागून सुमारे चार ट्रॅक्टर चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या घटनेत झापही जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
डुबेरेवाडी येथे संतू काशीनाथ सदगीर यांची गावाच्या दक्षिण बाजूला चोंडीचा खडक परिसरात वस्ती आहे. सदगीर यांनी जनावरांसाठी चार ट्रॅक्टर चारा विकत घेऊन रचून ठेवला होता. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास चाऱ्याने अचानक पेट घेतला. उन्हाच्या कडाक्यामुळे परिसरात कोणीही नव्हते. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांच्या सदर घटना लक्षात आली. क्षणार्धात चाऱ्याने पेट घेतल्याने मोठ्या ज्वाळा दिसत होत्या. दत्तू सदगीर, रघुनाथ वारुंगसे, हिराबाई बिन्नर यांनी आजूबाजूच्या रहिवाशांना आग विझविण्यासाठी बोलविले. वस्तीवरील शेतकऱ्यांनी घरातील पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
टंचाईने वस्तीवरील ग्रामस्थांना आग विझवणे शक्य नसल्याने काही तरुणांनी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयात फोन केला. अग्निशामक दलाचा बंब पाठविण्याची मागणी केली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशामक बंब दाखल झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तीन बंबांनी सुमारे २-३ तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. या चाऱ्याशेजारी असणाऱ्या हिराबाई संतू बिन्नर यांच्या झापासही आग लागली. बिन्नर यांच्या झापातील शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. तर सदगीर यांचा जनावरांसाठी साठविलेला चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. (वार्ताहर)

Web Title: Fodder firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.