शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या चौकशी कक्षावर उडवाउडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:51 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या चौकशी कक्षावर ‘प्रवासी हेच आमचे दैवत’ असे ब्रिदवाक्य प्रवाशांना जरी नजरेस पडत असले तरी ते ज्यांच्याकडे चौकशी करतात त्यांना मात्र या वाक्याचा विसर पडल्याचा अनुभव दररोज शेकडो प्रवाशांना येतो. त्यामुळे चौकशी कक्ष असून, नसल्यासारखा झाला आहे. तसेच त्याच्या उपयोगिता शून्य ठरत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या चौकशी कक्षावर ‘प्रवासी हेच आमचे दैवत’ असे ब्रिदवाक्य प्रवाशांना जरी नजरेस पडत असले तरी ते ज्यांच्याकडे चौकशी करतात त्यांना मात्र या वाक्याचा विसर पडल्याचा अनुभव दररोज शेकडो प्रवाशांना येतो. त्यामुळे चौकशी कक्ष असून, नसल्यासारखा झाला आहे. तसेच त्याच्या उपयोगिता शून्य ठरत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.महामंडळाची बससेवा तोट्यात असल्याची ओरड केली जाते; मात्र ही बससेवा ज्यांच्या भरवश्यावर चालते त्याच प्रवाशांची दिशाभूल करीत त्यांनी चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न चौकशी कक्षावरून होतो.प्रवासाच्या प्रारंभीच प्रवाशांना ‘कटकट’ अनुभवयास येते. याबाबत रविवारी (दि.२५) एका प्रवाशाला या बसस्थानकावर असाच काहीसा अनुभव आला. शिरपूरला जाणाऱ्या बसगाड्यांची चौकशी दूरध्वनीवरून केली असता दुपारी २, ३ व ४ वाजता थेट गाडी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र तीनच्या बससाठी प्रवासी गेला असता त्याला साडेतीन वाजता बस असल्याचे सांगण्यात आले.तोपर्यंत बस फलाटावर आली नाही, म्हणून त्याने चौकशी केली असता थेट शिरपूरला जाणारी बस नसल्याचे सांगून धुळे बस पकडून तेथूनशिरपूर जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार प्रवासी फलाटावर उभ्या असलेल्या नाशिक-चोपडा शिवशाही बसमध्ये बसला असता शिरपूर बस निघत असल्याची उद्घोषणा करण्यात आली. तद्नंतर एम.एच २०.१३९० ही बस शिरपूरसाठी निघत होती. त्यामुळे सदर प्रवाशाची धावपळ उडाली.उद्घोषणेमधील त्रुटी दूर व्हाव्यातबसस्थानकावर फलाटांची संख्या कमी असल्यामुळे काही बसेस या फलाट सोडून उभ्या असतात. त्यामुळे चौकशी कक्षातून त्या बससेची दखल घेतली जात नाही व प्रवाशांच्या माहितीस्तव कुठलीही उद्घोषणा केली जात नाही. बस निघण्याच्या वेळी उद्घोषणा कानावर येते त्यामुळे जेष्ठ नागरिक, महिला यांची धावपळ उडते.चौकशी कक्षातील ज्या कर्मचाºयाने प्रारंभी बस असल्याची माहिती दिली त्यानेच ती नंतर नसल्याचे सांगितले; मात्र पाच मिनिटांच्या अंतराने स्वत:च शिरपूर बसची उद्घोेषणाही केली. या अनागोंदी कारभारामुळे सदर चौकशी कक्षातील उद्घोषकांवर क ोणाचे नियंत्रण आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित व्हावा. कर्मचाºयाच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळNashikनाशिक