फुले पुतळ्याजवळील जुनी कोनशिला हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST2021-02-23T04:21:55+5:302021-02-23T04:21:55+5:30
याबाबत देवरे यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती हेमलता डगळे यांना निवेदन दिले आहे. तब्बल पन्नास वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्ष कै. ...

फुले पुतळ्याजवळील जुनी कोनशिला हटविली
याबाबत देवरे यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती हेमलता डगळे यांना निवेदन दिले आहे. तब्बल पन्नास वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्ष कै. कृष्णा नानाजी देवरे यांच्यासह तत्कालीन नगरसेवक कै. किसनराव वाघ, कै. काशीराम सोनवणे, कै. वेडू मोरे, कै. विठाबाई महिरे आदी पदाधिकार्यांच्या कार्यकाळात शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. त्या काळापासून या परिसरात पदाधिकार्यांच्या नावाची कोनशिलाही बसविण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे नूतनीकरण झाले. मात्र, यावेळी जुनी कोनशिला काढून विद्यमान नगराध्यक्ष व इतर नगरसेवकांची कोनशिला बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकारातून शहराच्या आजपर्यंतच्या इतिहासात शहर विकासासाठी मोलाचे योगदान देणार्या पालिकेच्या पदाधिकार्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करीत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने या पुतळा परिसरात जुनी कोनशिला सन्मानपूर्वक पूर्ववत बसवावी अन्यथा येत्या बुधवार (दि. २४) पासून पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही देवरे यांनी दिला आहे.
इन्फो
प्रशासन म्हणते, कोणताही अभिलेख नाही!
प्रशासनातर्फे मुख्याधिकारी श्रीमती डगळे यांनी देवरे यांना दिलेल्या पत्रात महात्मा फुले परिसरात असलेल्या जुन्या कोनशिलेबाबत केलेल्या तपासणीत प्रशासनाला कोणताही अधिकृत अभिलेख आढळून आलेला नसल्याचा खुलासा केला आहे. मात्र, आपण उपोषणावर ठाम असल्याचे देवरे यांनी जाहीर केले आहे.