सिद्धिविनायक मंदिरात फुलांची आरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:18 IST2018-05-04T00:18:10+5:302018-05-04T00:18:10+5:30

लोहोणेर : संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ठेंगोडा येथील स्वयंभू श्री सिद्धिविनायक मंदिरात आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली होती.

Flowers relief in Siddhivinayak Temple | सिद्धिविनायक मंदिरात फुलांची आरास

सिद्धिविनायक मंदिरात फुलांची आरास

लोहोणेर : संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ठेंगोडा येथील स्वयंभू श्री सिद्धिविनायक मंदिरात वणी येथील व्यापारी भक्त विकास शर्मा, नीलेश पिंगळे, मनोज साखला, पिंटू राका, भावेश पारेख, पाटील काका व सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात येऊन मंदिराची सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. मुळात आपण मागील अंगारिका चतुर्थीच्या दिवशी सिद्धिविनायक मंदिरात फुलांची आरास करावी असा या भाविकांचा व ट्रस्ट यांचा मनोदय होता; मात्र अंगारिका चतुर्थीला भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता हे शक्य नसल्याने त्यांनी आज संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून स्वयंभू श्री सिद्धिविनायक मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट करून मंदिर सजविले तसेच सिद्धिविनायक मंदिरा शेजारील छोटेखानी महादेव मंदिरातदेखील फुलांची सजावट करण्यात आल्याने परिसर फुलांमुळे शोभून दिसत होता.

Web Title: Flowers relief in Siddhivinayak Temple