शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

फुलांनी उत्पादक शेतकऱ्यांना दिला आर्थिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 01:03 IST

नायगाव : गेल्या काही दिवसांपासून मातीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या फुलांनी यंदा मात्र उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक आधार दिला आहे. अती पावसामुळे फुलांचे एकरी उत्पन्न घटल्यामुळे नवरात्रीत व दसऱ्याला चांगला दर मिळाल्याने उत्पादक बळीराजाच्या मातीतुन फुलांचा सुगंध दरवळला आहे.

ठळक मुद्देअसाच भाव दिवाळीत मिळण्याची आशा

नायगाव : गेल्या काही दिवसांपासून मातीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या फुलांनी यंदा मात्र उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक आधार दिला आहे. अती पावसामुळे फुलांचे एकरी उत्पन्न घटल्यामुळे नवरात्रीत व दसऱ्याला चांगला दर मिळाल्याने उत्पादक बळीराजाच्या मातीतुन फुलांचा सुगंध दरवळला आहे. नवरात्री, दसरा व दिवाळीत शेतकऱ्यांना हमखास आर्थिक आधार देणाऱ्या फुल शेतीला गेल्या दोन वर्षांपासून कधी अवकाळी तर कधी मातीमोल भावामुळे आर्थिक फटका बसत आहे. यंदाही अती पावसामुळे मोठ्या प्रमाणात फुल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते.बदलत्या हवामान व पावसामुळे फुलांचे एकरी उत्पादन घटल्याने बाजारात फुलांची आवक घटुन मागणी वाढली. अशा परस्थितीतुन वाचलेल्या फुलांना नवरात्रीत चांगला भाव मिळाला होता. दसऱ्यामुळे बाजारात फुलांना मागणी वाढली. मात्र आवक घटल्यामुळे भावातही मोठी वाढ बघायला मिळाली. नवरात्रीत ४० ते ५० रुपये किलोने विकलेल्या झेंडुला रिववारी दिडशे ते दोनशे रुपये प्रति किलो दर मिळाला. दुपार नंतर तर बाजारात फुलांची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले.चौकट...गेल्या चार-पाच वर्षांचा विचार करता यंदा फुल लागवडीचे क्षेत्र लाँकडाऊनमुळे घटले आहे. अल्प लागवड होऊन पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून यंदा प्रथमच फुलांचे दर शंभरीपार गेले आहे. वाढीव भावाचा फायदा हा कमी शेतकऱ्यांना झाला आहे. घटलेली आवक व वाढती मागणी लक्षात घेता दसऱ्या प्रमाणेच दिवाळीतही फुले भाव खाणार असे चित्र आहे.- गणेश कांगणे. फउल उत्पादक, दोनवाडे.मी गेल्या सात वर्षांपासून फुलशेती करत आहे. आजपर्यंत एकदा ही असा भाव मिळाला नाही मात्र यंदा फुलांना योग्य दर मिळाला असला तरी बदलत्या हवामानाबरोबर पावसामुळे उत्पादन घटल्याने अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. असाच भाव दिवाळीत मिळण्याची आशा आहे.- ज्ञानेश्वर दिघोळे. फुल उत्पादक. जायगाव. 

टॅग्स :FarmerशेतकरीNavratriनवरात्री