फुले जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:14+5:302021-01-08T04:43:14+5:30

एकलहरे : राष्ट्रवादी व समता परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष शानू निकम व मंगला संत यांच्या ...

Flower jubilee celebration | फुले जयंती साजरी

फुले जयंती साजरी

एकलहरे : राष्ट्रवादी व समता परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष शानू निकम व मंगला संत यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राकेश वाघ, शिमोन पाखरे, मोहन वाघ, अंकुश घायतडक, सूरज म्हस्के, तेजस गायकवाड, संगम देवरे, नितीन खरात आदी उपस्थित होते.

-------

गंगापाडळी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक राजेंद्र भोर, प्रज्ञा साळवे, तनुजा ढगे यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

-------

एकलहरे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साजरी करण्यात आली. शिक्षणतज्ज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, मुख्याध्यापक सुनंदा वानखेडे, विकास मानकर, शमीम पठाण, सुनीता जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी आयेशा मणियार, समीक्षा पगारे, प्रिया आहिरे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या स्री शिक्षणाच्या कार्याविषयी विचार मांडले. देवीदास राजोळे, रामदास पाटील, अशोक राजोळे, अशोक पवळे उपस्थित होते.

Web Title: Flower jubilee celebration