श्रावणामुळे बहरला फुलांचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:48 IST2017-08-05T00:48:26+5:302017-08-05T00:48:32+5:30
चतुर्मास सुरू झाला असून, श्रावणामासमुळे सध्या पारंपरिक फुलांबरोबरच खास या महिन्यात फुलणाºया फुलांचा गंध सध्या फुलबाजारात दरवळतो आहे.

श्रावणामुळे बहरला फुलांचा बाजार
नाशिक : चतुर्मास सुरू झाला असून, श्रावणामासमुळे सध्या पारंपरिक फुलांबरोबरच खास या महिन्यात फुलणाºया फुलांचा गंध सध्या फुलबाजारात दरवळतो आहे. व्रतवैकल्यांच्या या काळात फुलांना मोठी मागणी असते. फुलांचे दर सध्या स्थिर असून गौरी-गणपतीत फुलांची आवक, भाव वाढतील असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
लहान-मोठ्या आकारातील गुलाबाची फुले, झेंडू, मोगरा, सोनचाफा याबरोबरच निशिगंधा, तेरडा, सोनटक्का, लिली, दुर्वा, तुळस, बेल आदी विविध फुलांची बाजारात रेलचेल दिसत आहे. गुलाबांची आवक वाढल्याने भाव अतिशय कमी असून केशरी गुलाब, लाल गुलाबाच्या फुलांची गड्डी २ ते ६ रुपये, मोगरा ३०० ते ४०० रुपये किलो, झेंडू १०० ते २०० रुपये, निशिगंधा १२० ते १६०, लिली बंडल ८ ते १० रुपये, जास्वंदी ५० ते ६० रुपये, तुळस ६० ते ७० रुपये किलो, दुर्वा ५ रुपये जुडी या दराने उपलब्ध आहे. त्याचबरोबर श्रावणी सोमवारी लागणाºया बेलाचीही मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. २०० रुपये पाटी या दराने बेल सकाळी विकत घेऊन समोरच्या गिºहाईकाला हवा तसा विकला जातो.