वजन उचलण्यासाठी विद्यार्थ्यांनी विकसित केले ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:58 IST2019-04-02T18:57:42+5:302019-04-02T18:58:31+5:30
शहरातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत वजन उचलण्यासाठी परिधान करता येणारे ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’ तंत्रज्ञान विकसित केले असून या तंत्रज्ञानाला राज्यस्तरीय प्रकल्प प्रर्दशनात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. श्री महावीर एज्युकेशन सोसायटी नाशिकच्या महावीर पोलिटेक्निकच्या मेकैनिकल इंजीनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या यश भदाणे, प्रियदर्शनी देवरे, संकल्प नेटके, ऋतिक वाघुलीकर, सोमेश सूयंर्वंशी या विद्यार्थ्यांनी आपला ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’ हा नविन्यपूर्ण आणि समाजपयोगी प्रकल्प सदर करून ‘गगनांत २०१९’ प्रथम क्रमांक पटकावत परिक्षकांची मने जिंकली

वजन उचलण्यासाठी विद्यार्थ्यांनी विकसित केले ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’
नाशिक : शहरातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत वजन उचलण्यासाठी परिधान करता येणारे ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’ तंत्रज्ञान विकसित केले असून या तंत्रज्ञानाला राज्यस्तरीय प्रकल्प प्रर्दशनात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
श्री महावीर एज्युकेशन सोसायटी नाशिकच्या महावीर पोलिटेक्निकच्या मेकैनिकल इंजीनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या यश भदाणे, प्रियदर्शनी देवरे, संकल्प नेटके, ऋतिक वाघुलीकर, सोमेश सूयंर्वंशी या विद्यार्थ्यांनी आपला ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’ हा नविन्यपूर्ण आणि समाजपयोगी प्रकल्प सदर करून ‘गगनांत २०१९’ प्रथम क्रमांक पटकावत परिक्षकांची मने जिंकली. एखादी व्यक्ती कोणतेही वजन उचलतांना त्याची कंबर, पाठीचा कणा यावर मोठा ताण येत असतो अश्यावेळी कष्टाची कामे करता करता एखाद्या अपघातात अतोनात नुकसान घडून येते की जे कधीही भरून येवू शकत नाही, मानवी दु:ख आणि संवेदनांचा विचार करने व त्यावर मार्ग काढणे ही खरी तर समाज सेवाच, याठिकाणी विद्यार्थ्यांनी याचा विचार करुन वजन उचलण्यासाठी एक बॉडी फ्रेम अथवा चौकट तयार करून वजन उचलने आणि वजन पेलवणे या दोन्हीही क्रिया सहज व सोप्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रात्यक्षिकाला व्यावसायिक दृष्टीकोणातून प्रत्यक्षात आणल्यास औद्योगिक क्षेत्रात खुप उपयोगी ठरेल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. औद्योगिक वसहातींमध्ये हजारो मजूर काम करतात वजन उचलून एखादी विशिष्ट काम त्यांना दिवसभर करायचे असते, शेतकºयांना उत्पादित मालाची केरेट्स उचलावी लागतात पेस्टीसाइडच्या कैन्स अथवा अन्य कारनासाठी वजन उचालावे लागते, बांधकाम क्षेत्रात तसेच हमाली करतानाही वडन उचलतानाहीे ‘फूल बॉडी एक्सो स्केलेटन’ तंत्रज्ञान फायदा होऊ शकतो असा विशवास विद्यार्थ्यासह त्यांचे मार्गदर्शकांनी व्यक्त केला आहे.