शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जासाठी आज उडणार झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 00:56 IST

नाशिक : पितृपक्ष समाप्तीनंतर अर्ज दाखल होण्यास गती येऊ शकेल, असे वाटत असताना राजकीय समीकरणांच्या गणितात उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे मंगळवारपर्यंत अर्ज दाखल करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता. मात्र, आता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्यामुळे गुरुवारी (दि. ३) अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअवघे दोन दिवस शिल्लक : राजकीय पक्षांचे होणार शक्तिप्रदर्शन

 

 

नाशिक : पितृपक्ष समाप्तीनंतर अर्ज दाखल होण्यास गती येऊ शकेल, असे वाटत असताना राजकीय समीकरणांच्या गणितात उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे मंगळवारपर्यंत अर्ज दाखल करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता. मात्र, आता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्यामुळे गुरुवारी (दि. ३) अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने साहजिकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत्या दोन दिवसांत गर्दी होणार आहे. पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी तालुकानिहाय अर्ज दाखल करण्याची व्यवस्था असून, जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य या शहरातील तीन मतदारसंघांबरोबरच इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे गुरुवारी या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारासोबत चारच जणांना कक्षात येण्याची परवानगी आहे.गेल्या २७ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असला तरी पितृपक्षामुळे अनेकांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे सोमवारी अर्ज दाखल होऊ शकतील, असे वाटत असताना सोमवारी जिल्ह्यात अवघ्या ९ जणांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी जवळपास सर्वज राजकीय पक्षाचे प्रमुख उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. यातील अनेकांनी यापूर्वीच डमी अर्ज नेले आहेत. आता ते अधिकृत पक्षाचा एबी अर्ज दाखल करून उमेदवारी अर्ज दाखल करतील.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार २७ तारखेपासून ४ आॅक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी केवळ एका इच्छुकाने अर्ज सादर केला होता तर शनिवार आणि रविवार शासकीय सुटी असल्याने हे दोन्ही दिवस निरंक राहिले. दि. २ रोजी गांधी जयंतीनिमित्तानेदेखील अर्ज दाखल होऊ शकले नाहीत. जिल्हा प्रशासन सज्जगुरुवारी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता निवडणूक शाखेने संपूर्ण यंत्रणेला सज्जतेचे आदेश दिले आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ अशी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्रत्येक ठिकाणी उमेदवारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. गुरुवारी राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवारासोबत चारच प्रतिनिधी पाठविले जाणार आहेत. मात्र कार्यालयाबाहेरील गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान असणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक