नाशिकमधून आता हैदराबाद, इंदोरला विमानसेवा; १ जूनपासून नवी शहरे जोडणार
By संजय पाठक | Updated: May 11, 2023 09:50 IST2023-05-11T09:48:48+5:302023-05-11T09:50:03+5:30
कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. येत्या १ जून पासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

नाशिकमधून आता हैदराबाद, इंदोरला विमानसेवा; १ जूनपासून नवी शहरे जोडणार
नाशिक- ओझर विमानतळावरून रखडत असलेल्या विमान सेवेला इंडिगो कंपनीच्या विमानसेवेमुळे बुस्ट मिळाला आहे. या कंपनीमार्फत आता हैदराबाद आणि इंदोर येथे थेट विमानसेवा देण्यात येणार आहे. याशिवाय अहमदाबाद येथूनही येथेही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. येत्या १ जून पासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून अनेक विमान कंपन्यांनी सेवा सुरू केल्या आणि नंतर त्या बंद पडल्या आहेत मात्र इंडिगो या प्रतिथयश कंपनीने सुरू केलेल्या सेवा अत्यंत चांगल्या प्रतिसादात सुरू आहे त्यामुळे कंपनीने आणखी नवीन शहरांना विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.