शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

जीवघेण्या खड्ड्यांवरून ‘उड्डाण’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:32 AM

महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा म्हणून मान मिळविलेल्या व नाशिक शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. एकीकडे उड्डाणपुलाखाली शहर सौंदर्याच्या नावे सुशोभीकरण सुरू असताना पुलावरून मात्र मार्गक्रमण करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

नाशिक : महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा म्हणून मान मिळविलेल्या व नाशिक शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. एकीकडे उड्डाणपुलाखाली शहर सौंदर्याच्या नावे सुशोभीकरण सुरू असताना पुलावरून मात्र मार्गक्रमण करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पुलाच्या दुरुस्तीवरून राष्टÑवादी कॉँग्रेसने सत्ताधारी भाजपा सरकारला आरोपीच्या पिंजºयात उभे केले आहे.  मुंबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत गोंदे ते पिंपळगाव या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या सहा पदरीकरणाचे काम संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आले. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने नाशिक शहरातून जाणाºया या राष्टÑीय महामार्गाच्या उभारणीतून शहरांतर्गत वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून प्रकाश पेट्रोलपंप ते थेट पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत सुमारे ६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला. तर गरवारे चौफुली, पाथर्डी फाटा, राणेनगर, लेखानगर, इंदिरानगर याठिकाणी लहान पूल उभारण्यात येऊन राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक थेट मुंबईहून धुळ्याकडे तर धुळ्याकडून मुंबईकडे या उड्डाणपुलाच्या माध्यमातून काढण्यात आली. फेब्रुवारी २०१२ मध्ये या पुलाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.खड्ड्यांमुळे अपघातात वाढसर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. काही खड्ड्यांची अवस्था तर अतिशय भयंकर आहे. वाहनचालकाने कितीही सुरक्षित वाहन हाकण्याचा प्रयत्न केला तरी, खड्ड्यात जाणे क्रमप्राप्त आहे. काही ठिकाणी तर पुलावरील सर्व डांबर वाहून गेले व सीमेंट तसेच पुलाच्या बांधणीतील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यास त्याचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघाताला आमंत्रणही मिळाले आहे. लहान वाहनांचे खड्ड्यात आदळून टायर फुटण्याचे तसेच टायर बेंड होण्याचे प्रकारही घडू लागले आहेत.पुलासाठी पिंपळगावला टोल नाकानाशिककरांच्या सोयीसाठी त्याचबरोबर मुंबईहून धुळ्याकडे व धुळ्याकडून मुंबईकडे विनासायास वाहने जाण्यासाठी शहरात उभारण्यात आलेल्या सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलासाठी पिंपळगाव बसवंत येथे टोलनाका ठेवण्यात आला आहे. या टोलनाक्यावर वाहनांकडून टोल वसुली केली जात असून, त्यातून या महामार्गाच्या उभारणीसाठी आलेला खर्च कंपनीकडून वसूल केला जात आहे. साधारणत: तीन वर्षे ज्या कंपनीकडून रस्त्याची उभारणी केली जाते त्यांच्याकडून रस्त्याची देखभाल, दुरुस्ती केली जात असल्याने एल एन्ड टी या कंपनीची आता जबाबदारी संपुष्टात आली आहे. त्यामुळेच या महामार्गाची दुरवस्था झाली आहे.पावसामुळे दुरवस्थाइगतपुरी तालुक्यातील गोंदे ते पिंपळगाव बसवंतपर्यंत या महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांची अवस्था इतकी बिकट आहे की, खड्डे चुकविण्याच्या नादात लहान-मोठ्या अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. मध्यंतरी या महामार्गावर झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात आले, परंतु आता खड्ड्यांची अवस्थाच अशी झाली की, वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकरची गरजच राहिलेली नाही. यंदा सर्वाधिक पाऊस झाल्यामुळेच रस्त्याची अवस्था बिकट झाल्याचे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने मान्य केले आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची संख्याही अधिक असल्याकारणानेदेखील रस्ता वारंवार नादुरुस्त होण्याचे आणखी एक कारण आहे.