मक्याच्या कणसांना आग
By Admin | Updated: November 16, 2015 22:33 IST2015-11-16T22:32:56+5:302015-11-16T22:33:30+5:30
लोहोणेर : ४५ हजारांचे नुकसान

मक्याच्या कणसांना आग
लोहोणेर : लोहोणेर शिवारातील शेतातील मक्याच्या वरळला अचानक आग लागल्याने या आगीत सुमारे ३५ क्विंटल मका जळून खाक झाला. सुमारे ४५ हजार ५०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकलेले नाही.
लोहोणेर येथील तलाठ्यांनी पंचनामा केला असून, देवाळा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. लोहोणेर शिवारातील संगीता प्रभाकर अहिरे यांच्या मालकीची शेती असून, सदर शेती योगेश अशोक बोरशे हा निम्म्या वाट्याने कसत आहे. योगेश बोरसे याने या गटामध्ये मक्याचे पीक घेतले असून, सुमारे ३५ क्विंटल कणसाची वरळी घातली होती.
या वरळीला शनिवारी रात्री अचानक आग लागल्याचे रविवारी सकाळी लक्षात आले. यात योगेश बोरशे याचे सुमारे पंचेचाळीस हजार ५०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.लोहोणेर येथील तलाठ्यांनी पंचनामा केला असून, या संदर्भात देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (वार्ताहर)