शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

बोराळे ग्रामपंचायतीवर प्रगती पॅनलचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 18:19 IST

थेट सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी पवार

ठळक मुद्देग्रामपंचायतीत थेट सरपंचपदाबरोबरच सदस्य पदाच्या नऊ जागांसाठी ८८.५७ टक्के मतदान झाले होते

साकोरा : नांदगाव तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी उपसरपंच राजेंद्र पवार यांच्या प्रगती पॅनलने बाजी मारली असून, थेट सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी पवार विजयी झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदाबरोबरच सदस्य पदाच्या नऊ जागांसाठी ८८.५७ टक्के मतदान झाले होते.एकूण १५१४ मतदारांपैकी १३४१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्र मांक १ मधील एकूण ५३४ पैकी ४८७ मतदारांनी, तर प्रभाग क्रमांक २ मधील एकूण ४११ पैकी ३८०, तर प्रभाग क्रमांक ३ मधील एकूण ५६९ पैकी ४७४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. थेट सरपंचपदासाठी अश्विनी पवार व सुनीता सोळुंके यांच्यात, तर निवडणुकीत प्रगती पॅनल व गिरणेश्वर पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव असलेल्या थेट सरपंचपदाच्या जागेसाठी माजी उपसरपंच राजेंद्र पवार यांच्या पत्नी अश्विनी पवार, तर माजी सरपंच सुभाष सोळुंके यांच्या सून सुनीता सोळुंके यांच्यात सरळ लढत होती. त्यात अश्विनी पवार यांना ७५७, तर सुनीता सोळुंके याना ५८२ मते मिळाल्याने पवार यांनी १७५ मताधिक्य मिळवत विजय मिळवला.प्रभाग क्र मांक १ मधून उज्ज्वल सोळुंके (२५९), मोनाली सोळुंके (२५९ ), अश्विनी देवरे (२६९) विजयी झाले, तर प्रभाग क्र मांक २ मधून अनिल पाटील (२०१), भारती मोरे (२०८), ललिता सोळुंके (२१३) विजयी झाले. प्रभाग क्र मांक ३ मधून अनिल जाधव (२९२), रामभाऊ मोरे (३०४ )आणि सुनंदा मोरे (२३९) विजयी झाले.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक