अभोण्यात महिला प्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST2021-08-19T04:19:09+5:302021-08-19T04:19:09+5:30
मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील ग्रामपालिका कार्यालय प्रांगणात सरपंच सुनीता पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी सर्व सदस्य, ...

अभोण्यात महिला प्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण
मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील
ग्रामपालिका कार्यालय प्रांगणात सरपंच सुनीता पवार
यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी सर्व सदस्य, मान्य
वर, विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामविकास अधिकारी
जीभाऊ जाधव यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा
परिषद प्राथमिक शाळा (मुले) येथे उपसरपंच भाग्यश्री
बिरारी यांचे हस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुली)
येथे ग्रामपालिका सदस्या बेबीताई गांगुर्डे यांचे हस्ते तर
शास्त्रीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपालिका
सदस्य श्रीमती विजया जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सर्व ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक,
शिक्षकवृंद व मान्यवर उपास्थित होते. तसेच डांग सेवा
मंडळ नाशिक संचालित येथील जनता विद्यालय व
कनिष्ठ विद्यालयात प्राचार्य कल्पना शिरोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. दरम्यान, जि.प.मुलांच्या शाळा
प्रांगणात ग्रामपालिकेचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र पाटील यांचे
हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अभोणा पोलीस
स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक बागुल यांच्या हस्ते
तर अभोणा ग्रामीण रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. दीपक बहिरम यांचे हस्ते ध्वजारोहण झाले.