सुरगाणा तालुक्यात ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:18 IST2020-08-16T23:05:11+5:302020-08-17T00:18:21+5:30
सुरगाणा : शहरासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये, ग्रामीण रु ग्णालय, जि. प. शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सुरगाणा येथील शासकीय ध्वजारोहण तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

सुरगाणा येथे शासकीय ध्वजारोहण करून मानवंदना देताना विजय सूर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक नांद्रे आदी.
ठळक मुद्देवनविभागाच्या वतीने संचलन करून राष्टÑध्वजास मानवंदना देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुरगाणा : शहरासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये, ग्रामीण रु ग्णालय, जि. प. शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सुरगाणा येथील शासकीय ध्वजारोहण तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस अधिकारी नांद्रे, पोलीस कर्मचारी, वनविभाग अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस व वनविभागाच्या वतीने संचलन करून राष्टÑध्वजास मानवंदना देण्यात आली.