लासलगावी शाळांमध्ये ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:39+5:302021-08-17T04:20:39+5:30
एनसीसी, लेझीम, झांजर आणि ढोल पथकाने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची मने जिंकली. लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे प्राचार्य ...

लासलगावी शाळांमध्ये ध्वजारोहण
एनसीसी, लेझीम, झांजर आणि ढोल पथकाने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची मने जिंकली. लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे प्राचार्य विश्वासराव पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत संस्थेच्या शैक्षणिक विकासाचा चढता आलेख सादर केला. पोपटराव नवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दिवसभरात वृक्षारोपण, प्रश्नमंजुषा, वादविवाद, देशभक्तीपर गीत, निबंध, वकृत्व, काव्य, नृत्य, स्वातंत्र्य संग्रामाच्या दुर्मीळ छायाचित्रांचे संकलन, रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात करण्यात आले. या सर्व उपक्रमात विद्यार्थ्यांनी घरी राहून भरघोस सहभाग नोंदविला. ध्वजवंदनाचा संपूर्ण सोहळा वर्गशिक्षक यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांना व्हिडीओ क्लिपद्वारे पाठविण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, पं.स. सदस्या रंजनाताई पाटील, संचालिका नीताताई पाटील, पुष्पाताई दरेकर, सीताराम जगताप, शंतनू पाटील, लक्ष्मण मापरी, कैलास ठोंबरे, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, प्रकाश गांगुर्डे, दादासाहेब कदम, मधुकर सरोदे, किशोर क्षीरसागर, प्रदीप माठा, तुळशीराम जाधव, निवृत्ती कुटे, मुख्याध्यापक अनिस काझी, पर्यवेक्षक दत्तू गांगुर्डे, सुधाकर सोनवणे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौतिक आवारे व प्रमोद पवार यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका संजीवनी पाटील यांनी मानले.
फोटो- १६ लासलगाव स्कूल
160821\16nsk_28_16082021_13.jpg
फोटो- १६ लासलगाव स्कूल