दिव्यांग मुलीच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:27+5:302021-08-17T04:20:27+5:30
नवजीवन पवार हे मध्यप्रदेशातील कुक्षी येथे उपजिल्हाधिकारी या पदावर १९ जुलैपासून कार्यरत आहेत. संस्कार, संस्कृती व सभ्यता ...

दिव्यांग मुलीच्या हस्ते ध्वजारोहण
नवजीवन पवार हे मध्यप्रदेशातील कुक्षी येथे उपजिल्हाधिकारी या पदावर १९ जुलैपासून कार्यरत आहेत. संस्कार, संस्कृती व सभ्यता अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या नवजीवन पवार यांची आई जिल्हा परिषद शिक्षिका असून बहीण उच्चविद्याविभूषित आहे. मराठा विद्या प्रसारक समाजाचे उपसभापतीपद भूषविलेले वडील विजय तुकाराम पवार यांच्या त्यागामुळे नवजीवन यांनी आज उपजिल्हाधिकारी पदावर झेप घेतली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर या भागातील समस्यांचे निराकारण करण्यासाठी परिसराचा दौरा केला असता बरुड बीन या गावात जाण्याचा योग आला. त्यावेळी रोशनी नामक दिव्यांग (अंध) मुलीशी त्यांची भेट झाली. रोशनी दिव्यांग असूनही प्रमाणपत्राअभावी कोणत्याही शासकीय योजनेचा तिला लाभ मिळाला नाही व उपचाराअभावी तिला दिव्यांगच राहावे लागले ही माहिती मिळताच नवजीवन पवार यांनी तातडीचा निर्णय घेत प्रमाणपत्र तयार करण्याबाबत अग्रक्रम दिला. तसेच डोळ्यांवर उपचार व शिक्षणासाठी सर्वकष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. याशिवाय या दिव्यांग मुलीच्या हस्ते कुक्षीच्या उपविभागीय कार्यालयात व कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
फोटो- १६ नवीबेज
160821\16nsk_19_16082021_13.jpg
फोटो- १६ नवीबेज