जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:53+5:302021-02-05T05:43:53+5:30
यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी मागील वर्षातील अभूतपूर्व असे कोरोना संकट हाताळण्यात सर्व पदाधिकारी, शासकीय अधिकारी, ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी मागील वर्षातील अभूतपूर्व असे कोरोना संकट हाताळण्यात सर्व पदाधिकारी, शासकीय अधिकारी, नागरिक, स्वयंसेवी संस्था यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे, असेही ते म्हणाले. मागील वर्षी नागरिकांना सर्वाधिक सेवा, सेवा हक्क अधिनियमाखाली आपण दिले आहेत तर यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज डिजिटाईज्ड करुन कागदविरहित कामकाजावर भर देण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मिना, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी डॉ.अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी स्वाती थविल, नितीन मुंडावरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, तहसीलदार रचना पवार, प्रशांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
(फोटो: कलेक्टर )