इस्पॅलियर स्कूलमध्ये चक्क रोबोटच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:21 IST2021-08-17T04:21:11+5:302021-08-17T04:21:11+5:30
करत अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी बनवलेला रोबो हाच यंदा प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्य ...

इस्पॅलियर स्कूलमध्ये चक्क रोबोटच्या हस्ते ध्वजारोहण
करत अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी बनवलेला रोबो हाच यंदा प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत आला. स्कूलचे प्रमुख तथा शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोबो क्षितिज कुलकर्णी, आर्या पगारे, निहारिका साठे, भाविन बागमार आणि हितेन पेरकर या आठवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे शिक्षक सोनू कदम आणि स्नेहल यांनी केले.
मुख्याध्यापिका अंकिता कुर्या, सबा खान आणि अध्यक्ष डॉ. प्राजक्ता जोशी यांनी रोबोट तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. रोबोटच्या हस्ते झेंडावंदन झाल्यानंतर शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील विविध समस्या सोडवण्यासाठी नवीन पिढीला तयार करणे हा उद्देश असल्याचे सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक तसेच पालक ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.
छायाचित्र १६रोबोट