इमारत मागणीसाठी मैदानावर फडकवला झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:16 PM2020-01-27T22:16:40+5:302020-01-28T00:30:54+5:30

पाच वर्षांपूर्वी कौल बदलण्याच्या नावाखाली निर्लेखित झालेल्या जिल्हा परिषदेच्या मोकळ्या आवारात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .आपल्या हक्काची इमारत मिळावी यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोकळ्या पटांगणात ध्वज फडकावला.

A flag hoisted on the ground to demand a building | इमारत मागणीसाठी मैदानावर फडकवला झेंडा

ओझर येथ जिल्हा परिषद शाळेच्या निर्लेखीत जागेवर तिरंगा फडकवताना माजी मुख्याध्यापक गोविंद चौरे, भाऊसाहेब कदम, प्रकाश महाले, पांडुरंग आहेर, अशोक झोटिंग आदि.

Next
ठळक मुद्देओझर : बसायला हक्काची जागा मिळविण्यासाठी प्रशासनाचे वेधले लक्ष

ओझर : पाच वर्षांपूर्वी कौल बदलण्याच्या नावाखाली निर्लेखित झालेल्या जिल्हा परिषदेच्या मोकळ्या आवारात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .आपल्या हक्काची इमारत मिळावी यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोकळ्या पटांगणात ध्वज फडकावला.
इमारत निर्लेखित करून पाच वर्षांचा कालावधी लोटला असून अजूनही शाळेला इमारत नसल्याने विद्यार्थी बाजारपेठेतील शाळेत बसतात़ मागील १५ आॅगस्ट व २६ जानेवारी पासून विद्यार्थी याच जागेवर ध्वज फडकवतात़
वर्षभरापूर्वी एक सामाजिक संस्था सदर शाळेचे बांधकाम करून देण्यास तयार झाली होती त्यांनी बांधकाम करारनामा देखील तयार केला होता परंतु करारनाम्यावर ग्रामपंचायत परवानगीची आवश्यकता होती नेमकी तीच गोष्ट अडचणीची ठरली व त्यामुळे बांधकाम करार रद्द झाला व विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले .आपल्या स्वत:ची हक्काची नवीन इमारत कधी तयार होते व आपण त्या इमारतीत तिरंगा कधी फडकतो हेविद्यार्थ्यांचे स्वप्न कधी पूर्ण होईल हे याकडे लक्ष लागून आहे.

जुन्या निधीच्या दराप्रमाणे शाळेचे बांधकाम होणे शक्य नसल्याने आता एचएएल च्या स्थानिक विकास निधीतून शाळा बांधकाम करून देण्यासंदर्भात एचएएल कंपनी ने ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार केला असून एक कोटी रु पये मंजूर करीत असल्याचे त्यांनी कळवले आहे .
-जान्हवी कदम,
सरपंच ओझर.

एम्पथी फाउंडेशनला शाळा बांधकामासाठी २२ लाख रु पयांची गरज होती. निधी अपुरा असल्याकारणाने या शाळेसाठी ११ लाख रु पयांचा स्थानिक आमदार विकास निधी च्या माध्यमातून मंजूर झाला असून त्याची निविदा देखील निघालेली आहे. लवकरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल़
- अनिल कदम, माजी आमदार निफाड विधानसभा

Web Title: A flag hoisted on the ground to demand a building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.